सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. शहरातील पक्ष-संघटना मजबूत करण्यासाठी आता शरद पवारांनी राजकीय हालचालींमध्ये वाढ असून सांगोला आणि मंगळवेढा तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची अजित पवार चर्चा करणार आहेत. परंतु शरद पवारांच्या दौऱ्याच्या आधीच अजित पवार शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटातील बडा नेता अजित पवार गटात दाखल होणार आहे.
हेही वाचा…ना नामदेव ना रामदास..! चौथाच व्यक्ती निघाला शरद मोहोळचा मारेकरी, जुना वाद, अन् काढला काटा
अजित पवार संगोला आणि मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यातच सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू. डॉ. अनिकेत देशमुख यांच्या युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवासाठी अजित पवार अध्यक्ष आहेत. मंगळवेढ्यातील शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकत्र येणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम झाल्यानंतर पवार हे सोलापूरात मुक्कामासाठी येणार आहेत. त्यापुर्वीच अजित पवार शरद पवारांना मोठा धक्का देणार आहेत.
हेही वाचा…“मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ मिळाले अन् देवरांना नवे व्हिजन मिळाले”,ठाकरे गटाची जोरदार टीका
शरद पवार गटातील माजी नगरसेवक तौफिक शेख, आनंद चंदनशिवे यांच्याबरोबर इरफान शेख, गणेश पुजारी, साजित पटेल यांच्यासह मान्यवरांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दानलात राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. हे सर्व नेते सध्या मुंबईत दाखल झाले आहेत. तौफिक शेख यांनी एमआयएमच्या उमेदवारीवर सोलापूर शहरामध्ये मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना चांगलाच घाम फोडला होता.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे तेरा माजी नगरसेवकांनीही प्रवेश केला होता. ते सर्व तौफिक शेख यांचे नेतृत्व मान्य करतात.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना मिळाली रश्मी ठाकरेंची ताकद, शिंदे गटाला धुळ चारण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात
हेही वाचा…“आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे अन् काही तरी..,”सरकारच्या पडद्यामागील हालचालींबाबत जरांगे पाटलांची साशंकता
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, कोण कोण असणार ? उत्सुकता शिगेला पोहचली
हेही वाचा…” राज्य सरकारकडून जनतेच्या पैशांची खुलेआम लूट”, दावोस दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंची जोरदार टिका
हेही वाचा…“मी मटण खातो; मटण, म्हणजेच मांसाहार करतो”, जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांवर पलटवार