ठाणे : प्रभू श्रीरामला ज्यांनी नाकारले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते, पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत कुणीही खरे वाघ नाहीत. अशी टिका उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. त्याचवेळी राम काय खातो, यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलय असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली. त्यावर आता आव्हाडांनी देखील प्रत्युत्तर दिलंय आहे.
हेही वाचा…“शरद पवार गटातील ५ आमदार अन् २ बडे नेते अजिदादांच्या संपर्कात,” शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टीका करीत असतांना म्हटले की, ‘ते काय शेणही खात असतील!’ मी माझ्या भाषणात स्पष्ट म्हटले होते की, “मी मटण खातो; मटण खातो, म्हणजेच मांसाहार करतो.” महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सुमारे ७७ टक्के लोक मांसाहारी आहेत. मग, मांसाहार करणारा प्रत्येक माणूस शेण खातो, असे जर आपले म्हणणे असेल तर देशातील ७७ टक्के लोक शेण खातात, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच, बहुजन समाज शेण खातो, असे आपले म्हणणे असेल तर आश्चर्यच आहे. हो, नाहीतरी आता नवीन सुरु झाले आहे की, मांसाहार करणारे हे जरा खालचेच असतात असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
हेही वाचा…५० खोके, ५० लोकं, वऱ्हाड निघालं दाओसला ; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
दरम्यान, ठाणे येथील घोडबंदर भागातील आंनदनगर भागात रामकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रविवारी सांयकाळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, ,संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडाडून टिका केली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी माझ्यावर टीका करीत असतांना म्हटले की, ‘ते काय शेणही खात असतील!’ मी माझ्या भाषणात स्पष्ट म्हटले होते की, “मी मटण खातो; मटण खातो, म्हणजेच मांसाहार करतो.” महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सुमारे ७७ टक्के लोक मांसाहारी आहेत. मग, मांसाहार…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 15, 2024
READ ALSO :
हेही वाचा…ना नामदेव ना रामदास..! चौथाच व्यक्ती निघाला शरद मोहोळचा मारेकरी, जुना वाद, अन् काढला काटा
हेही वाचा“मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ मिळाले अन् देवरांना नवे व्हिजन मिळाले”,ठाकरे गटाची जोरदार टीका
हेही वाचा…“महाराष्ट्रात राहून मराठी जणांनी जमीन गमावली तर उद्या…” राज ठाकरेंनी दिला धोक्याचा इशारा
हेही वाचा…गौतमी अदानी ते विविध देशांतील प्रमुखांशी चर्चा, असा असणार मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा
हेही वाचा…श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कल्याणमधून सुषमा अंधारेंना लोकसभेची उमेदवारी द्या, पदाधिकाऱ्यांची ठाकरेंकडे मागणी