मुंबई : शिवसेनेचे नेते आणि पालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकल्याची घटना ताजी असताना शिवसेनेला अजून एक धक्का बसला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय युवासेनेचे नेते पदाधिकारी राहूल कनाल यांच्या घरी आज आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याआधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अशाप्रकाराची कारवाई होत असल्याने राजकीय वर्तूळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा रूग्णालय गल्लीतील नाईन अल्मेडा या इमारातीवर आज आयकर विभागाने छापा टाकला. यावेळी सुरक्षा रक्षकांचा कडक पाहारा तैनात करण्यात आला. शिवसेने नेते यशंवत जाधव यांच्या घरी तब्बल सात दिवस आयकर विभागाचे अधिकारी ठाण मांडून बसले होते. त्यामुळे आता राहुल कनाल यांच्या घरी किती दिवस अजून चौकशी सूरू राहणार ते आता पहाणं महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अजितदादांचं राज्यपालांना साकडं; कोश्यारी निर्णय घेणार?
शिवसेना खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदमध्ये संजय राऊत केंद्रीय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याची शक्यता आहे. त्याआधी आयकर विभागाने राहुल कनाल यांच्या घरी छापा टाकल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
मागील महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. यावरून सत्ताधारी पक्ष भाजपवर जोरदार निशाणा साधत आहेत.
Read also:
- मग नारायण राणेंचा राजीनामा का घेतला नाही, नवाब मलिकांवरील कारवाई अयोग्य- शरद पवार
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
- महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
- आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा