नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक नवीन नोटीस जारी करत टीकटॉकसह 59 चीनी अॅप्सवर कायमस्वरूपाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांकडून समाधानकारक स्पष्टीकरण/प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गेल्यावर्षी जूनमध्ये केंद्र सरकारने चीनसोबत सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शेकडो चीनी अॅप्सवर बंदी घातली होती. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 59 अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यात टिकटॉक, यूसी ब्राउजर आणि व्हीचॅट सारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश होता.
राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगत या अॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने त्यावेळी घेतला होता.
सरकारने अॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपासाठी बंदी घातली होती. मात्र आता 59 चिनी अॅप्सवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. मागील सहा महिन्यात सरकारने आणखी 208 अॅप्सवर बंदी घातली आहे. कंपन्या प्रतिसाद देण्यास असमर्थ ठरल्याने केंद्राने अखेर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read Also :
- ‘मी भाजपसमोर झुकण्यापेक्षा गळा कापून घेणं पसंत करेल’
- ‘राहुल गांधींना रोज मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर’, भाजपची सेनेवर बोचरी टीका
- ‘या तथाकथित पर्यावरणप्रेमी कुटुंबियाने…’, अमृता फडणवीसांचा ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल
- मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे सायबर हल्ला ? गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण
- राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी ? शिवेंद्रराजेंसह अनेकजण पुन्हा परतण्याचे नवाब मलिकांकडून संकेत