मुंबई : शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि नेत्या प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर संसदेत १२ खासदारांचे निलंबन झाले होते त्याठिकाणी धरणे आंदोलन सुरु असल्याने राऊतही त्याठिकाणी भेट देण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांचे आगमन झाले असता राऊतांनी त्यांना खुर्ची देण्यासाठी धडपड केली. यासर्व घडामोडीनंतर संजय राऊतांना भाजपने डिवचले होते.
कोकणात मनसेची हवा, खेडमध्ये पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकही मनसेत
एका पत्रकारपरिषदेत राऊतांनी भाजपच्या नेत्यांचा उल्लेख ‘ते च्युतिया आहेत’ असा केला होता. त्यावर भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या महिला विभागाने थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आज संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“कसं काय शेलार बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?”; शिवसेनेचे आक्षेपार्ह पोस्टर
गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय हेतू आहे. माझा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केला आहे. सीबीआय, आयटी, ईडीचा माझ्याविरोधात वापर करता आला नाही म्हणून माझ्या पक्षाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. मी एक खासदार आहे, माझ्याविरोधात तक्रार देण्यास काहींना प्रेरित करणे चुकीचे आहे, असे राऊत म्हणाले.
महापौर करण्यासाठी एका एका नगरसेवकला ३५-३५ लाख रुपये दिले ; विनय कोरेंचा गौप्यस्फोट
मूर्ख म्हणणं, अशिक्षित अडाणी म्हणणं हे वारंवार आपल्या राजकारणात आपण शब्द वापरतो. मी तो शब्द वापरला. तो शब्द या देशातला नाही तर जगातल्या कुठल्याही डिक्शनरी मध्ये त्याचा अर्थ पाहिला तर मूर्ख बुद्धू असा दिलेला आहे. जर या शब्दाबाबत गुन्हे दाखल व्हायला लागले तर या देशात कायद्याचे राज्य राहिलेलं नाही असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.
Read Also :
- किरीट सोमय्यांच्या रडारवर आता महाविकास आघाडीतील ‘हा’ नेता..
- “ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात”
- पेपरफुटी प्रकरण: जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर अभाविपची निदर्शने, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची उचलबांगडी
- निवडणुका रद्द होणार की ओबीसींशिवाय?; आज महत्वाचा दिवस, सुप्रीम कोर्टात सुनावणी
- संजय राऊतांना धक्का: ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल, भाजपा महिला नेत्यानी दिली तक्रार