दादर : ड्रग्ज प्रकरणात अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. तसेच या प्रकरणातील जे साक्षीदार आहेत. त्यांची विश्वासहार्यता संपुष्टात आल्यास नंतर कोणताही साक्षीदार साक्षीसाठी परत येणार नाही. अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावर आधारित आरोप करणं हे दुर्दैवी आहे. असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दादरा नगर-हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
अखेर समीर वानखेडे यांचा करेक्ट कार्यक्रम; लवकरच बदली होणार?
हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मी यावर फार भाष्य करणार नाही.पण माझे मत आहे की, अधिकाऱ्यांना धमकी देणे हे बरोबर नाही. जे साक्षीदार त्यांची विश्वासहर्ता संपेल अशी कारवाई झाल्यास पुढे कोणी साक्ष देण्यास पुढे येणार नाही. पण मी मानतो की काही आरोप लागले आहेत तर एनसीबीनेही त्याची चौकशी करावी, असं फडणवीस म्हणाले. दादरा नगर हवेलीत शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेने ज्या प्रकारे उमेदवारी देऊन अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा संधीसाधूपणा आहे. एका दु:खद घटनेचं राजकारण शिवसेना करत असून ते योग्य नाही. लोकांना ते आवडणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
LIVE | Addressing public meeting at Silvassa for Dadra & Nagar Haveli #byelection with Hon Union Minister @PRupala ji, @BJP4India National Secretary @VijayaRahatkar tai, other leaders.#BJP4DNH @BJP4DnNH https://t.co/jvkTi9ZKZY
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 26, 2021
शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केलाय. ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांचं करतील, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.
Read Also :
- महाविकास आघाडी सरकारने औकातीत राहावं, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; भाजप आमदाराने भरला दम
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक; सायबर सेलकडे तक्रार
- देवाकडून बंद होणारा ऑक्सिजन पुरवठा मीच सुरू केला, असंही उदयनराजे म्हणतील – शिवेंद्रराजेंचा घणाघात
- शिवसेनेत उडाली खळबळ; नाराज पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे, राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
- जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय – चित्रा वाघ