सातारा : सातारा येथे काय होत आहे हे सर्व उदयनराजेमुळे होत, साताराला ऑक्सिजनचा पुरवठा देवा कडून बंद होणार होता तो सुद्धा मी सुरू केलाला आहे असं सुध्दा ते म्हणतील” असा टोला शिवेंद्रराजेंनी उदयन महाराजांना लगावला आहे. ते आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
समीर वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्स प्लांट करतो; NCB अधिकाऱ्याचं खळबळजनक निनावी पत्र
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक रणधुमाळीला सुरवात झाली असून या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या पॅनल मध्ये अद्याप तरी जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी दबाव तंत्राचा वापर करत बँकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे संचालक मंडळ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिले कसे? असा सवाल उपस्थित करत मी बँकेत जागा अडविण्यासाठी संचालक झालो नाही. तर शेतकऱ्यांच्या हिताची देखरेख करण्याकरिता बँकेत मला पाठवले,, असल्याचे सांगत आज अचानक माध्यमांशी संवाद साधला.
पुणे महापालिकेत लोकसंख्येनिहाय नगरसेवकांची संख्या ठरणार? 166 ऐवजी 183 उमेदवार असणार!
या वेळी बोलत असताना त्यांनी संचालक मंडळ आणि चेअरमन यांच्यावर टीका केली. या उदयनराजेंच्या वक्तव्यावरती शिवेंद्रराजेंनी आक्रमक भूमिका घेत खा.उदयनराजेंवर जोरदार टीका केली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागली नाही उदयनराजे यांना माहित नसावे ED ने जी माहिती मागवली ती जरंडेश्वर कारखान्यांना दिलेल्या फायनान्स Fianance बाबत ती दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर ची सर्व कागदपत्रे तपासून हे कर्ज दिले आहे. सध्या जरंडेश्वरचे सर्व हप्ते नियमित सुरू आहेत. उदयनराजे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आरोप का करत आहेत माहिती नाही मागील काही दिवसापूर्वी जिल्हा बँकेची बैठक पार पडली त्यामध्ये त्यांनी बँकेला नावाजले होते. तुमच्या चॅनलने प्रसिद्धी दिली होती. यावेळी प्रसार माध्यमांना उदयनराजेंची मोबाईलवर असणारी मुलाखत त्यांनी दाखवली. या मुलाखतीत ते स्पष्ट म्हणाले बँक चांगली चालली आहे.
Read Also :
- शिवसेनेत उडाली खळबळ; नाराज पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे, राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
- जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय – चित्रा वाघ
- समीर वानखेडे यांच्या कुटूंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या; जीवाला धोका असल्याचा पत्नीचा दावा
- अखेर समीर वानखेडे यांचा करेक्ट कार्यक्रम; लवकरच बदली होणार?
- समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला, माझी मुलगी गुन्हेगार आहे काय? – नवाब मलिक