मुंबई : कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीत हरलो तर हिमालयात निघून जाईन असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या राज्यात जोरदार सुरू आहे. त्यावरून कोल्हापुरात निवडणुक हरलो तर हिमालयात जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना काॅंग्रेसकडून स्वेटर, मफलर, कानटोपी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीमार्फेत देण्यात येईल असं म्हटलं आहे. आता यावरून राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, मी आज चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात आढावा घेण्यासाठी आलो आहे. त्यांनी कोल्हापुर मागेच सोडलंय, परंतु मी कोथरूडमधील कार्यकर्त्यांशी सवांद साधला. त्यावरून चंद्रकांत पाटील यांना हाही मतदारसंघ सोडावा लागेल इतकं त्यांच्याविषयी प्रेम आपुलकी येथे दिसत आहे. चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील, तर मी देखील त्यांच्यासोबत जाईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.
कोल्हापुरात ‘कमळ’ कोमजलं! पोटनिवडणुकीत काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधवांचा दणदणीत विजय
पराभव एका मताने केला काय आणि हजार मतांनी केला काय, पराभवहा पराभव असतो. चंद्रकांत पाटलांना निवडणुकीला उभं राहण्याची संधी होती. परंतु असो. चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील, तर मी मीही जाईन माझी देखील हिमालयात जाण्याची इच्छा आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकसंघ पद्धतीने काम केलं आहे. पुरोगामीत्वाकडे महाराष्ट्र झुकलेला आहे याचे हे द्योतक आहे. असंही ते म्हणाले.
कोल्हापुर पोटनिवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का?
दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. सत्यजित कदम आणि जयश्री जाधव यांच्यात यावेळी चांगलीच चुरस बघायला मिळाली. या पोटनिवडणुकीत 61.19 टक्के मतदान झालं त्यापैकी एकुण 2 लाख 91 हजार 978 मतदार होतं. यात एक लाख 78 हजार मतदारांनी मतदान केलं. आज झालेल्या मतमोजणीत तब्बल 26 फेऱ्यात जयश्री जाधव याच आघाडीवर होत्या . त्यात त्यांचा विजय झाला.
Read also:
- “बजरंग बली हनुमान कधीच ‘महागाईच्या रावणा’ची साथ देऊ शकणार नाही”
- “डरपोक भाजपचा कणखर मतदारांनीच कपडे फाडले”; नाना पटोलेंची भाजपवर टीका
- “निवडणुकीत भाजपाने सत्ताधाऱ्यांना तोंडाला फेस आणला”; पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- त्यांचे भोंगें कोल्हापुरकरांनीच खाली उतरवले! संजय राऊतांचा मनसे, भाजपला टोला
- “हिमालयात जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना काॅंग्रेसकडून स्वेटर, मफलर, कानटोपी देण्यात येईल”