मुंबई : काॅंग्रेस आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत तब्बल 18, 901 मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील आणि काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण व फटाक्याची आताषाबाजी करीत जल्लोष साजरा केला. याच पार्श्वभूमीर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
करूणा मुंडेना कोल्हापुर पोटनिवडणुकीत अवघी 61 मत; काॅंग्रेस, भाजपविरोधात तक्रार दाखल करणार
रोहित पवार म्हणाले की, ढोंगी व स्थार्थी राजकारणाला जनतेने कोल्हापुरमध्ये उत्तर दिलं आहे. हा विजय मतदार, महाविकास आघाडी सरकारचे कार्यकर्ते व नेते यांच्या प्रमाणिक प्रयत्नांचा स्व: अण्णांना वाहिलेली श्रद्धांजली आणि विकासाला दिलेला पाठिंबा आहे. लोकशाहीच्या माध्यामातून अपयश आल्यावर सत्तेचा गैरवापर करून दडपशाही करणं हे भाजपच्या हातातील प्रमुख अस्स आहे. त्यामुळे कोल्हापुरच्या पराभवामुळं भविष्यात केंद्रीय यंत्रणा अधिक कार्यक्षम झाल्या तर आश्चार्य वाटणार नाही. परंतु तरीहीह महराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही. तर अन् झुकणारही नाही, असंही ते म्हणाले.
कोल्हापुर पोटनिवडणुक निकाल ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी घेतली आघाडी
या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. सत्यजित कदम आणि जयश्री जाधव यांच्यात यावेळी चांगलीच चुरस बघायला मिळाली. या पोटनिवडणुकीत 61.19 टक्के मतदान झालं त्यापैकी एकुण 2 लाख 91 हजार 978 मतदार होतं. यात एक लाख 78 हजार मतदारांनी मतदान केलं. आज झालेल्या मतमोजणीत तब्बल 26 फेऱ्यात जयश्री जाधव याच आघाडीवर होत्या . त्यात त्यांचा विजय झाला.
“राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी! ते मुस्लिम, तर हे हिंदू समाजाला भडकविण्याचं काम करताहेत”
दरम्यान, भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर काॅंग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील यांची प्राण प्रतिष्ठा प्रणाला लागली होती. मात्र यामध्ये कोल्हापुर उत्तर भागाचा गड पालकमंत्री सतेज पाटील यांना राखण्यात यश आलं. सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावडा परिसरातील मतदार काय करणार याविषयी उत्सुकता होती. मात्र मतदारांनी सतेज पाटील यांच्याकडे कल दिला.
Read also:
- कोल्हापुरात ‘कमळ’ कोमजलं! पोटनिवडणुकीत काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधवांचा दणदणीत विजय
- कोल्हापुर पोटनिवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का?
- राणा दाम्पत्यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन! मुख्यमंत्र्यांनावरही साधला निशाणा
- 17 वी फेरीही काॅंग्रेसच्या पारड्यात ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय निश्चित
- आमदारपदी निवड झाल्याबद्दल जयश्री जाधव यांचं अभिनंदन! निवडणुक निकालाआधी लागलेत बॅनर्स