कोल्हापुर : काॅंग्रेस आमदार चंद्राकांत जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत काॅंग्रेस, महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून या निवडणुकीच्या रिंगणात सत्यजित कदम उतरले. पहिल्या फेरीपासून तर सोळाव्या फेरीपर्यंत जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती. मात्र 17 फेरी ही भाजपच्या पारड्यात पडली आहे.
आदित्य ठाकरे यांचा काका राज ठाकरे यांना सल्ला !म्हणाले की, मशिदीवरील भोंग्यापेक्षा..;
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना 17 व्या फेरीनंतर 34 हजार 784 मत मिळाली आहेत. तर सत्यजित कदम यांना 51 हजार 688 मत मिळाली आहेत. त्यामुळे जयश्री जाधव यांच्याकडे आता 13 हजार 098 मतांनी आघाडी आहे. या निवडणुकीचा निकाल दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे.पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये पुर्ण झाली असून त्यामध्ये जयश्री जाधव यांना तब्बल 7501 मतांची आघाडी मिळाली आहे.
हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला जाणार की नाहीत; वसंत मोरेंनी स्पष्ट सांगितलं
सोळाव्या फेरीत काॅंग्रेसकडे 3638 तर भाजपकडे 3847 मत आघाडी घेतली आहे. यावेळी भाजपकडे आता 209 लीड आहे तर काॅंग्रेसने या संपुर्ण फेरीत 13789 मतांनी आघाडी घेतली आहे. दहाव्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 39,605 तर सत्यजित कदम यांना 31,512 मते मिळाली आहेत. 8073 मताची आघाडी आहे. तर 8 हजार मतांनी जयश्री जाधव यांनी सत्यजित कदम यांच्यावर आघाडी घेतली आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत पोटनिवडणुकीत काॅंग्रेस पहिल्यापासून आघाडीवर आहे. मात्र दहाव्या फेरीनंतर करूणा मुंडे यांना फक्त 61 मत मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.
लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा! भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांची रूग्णालयात भेटण्यासाठी रिघ
दरम्यान, कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुकीचा गुलाल महाविकास आघाडी उधळणार असा आशावाद जयश्री जाधव यांनी मांडला आहे. कोल्हापुरचा स्वाभिमान जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यामुळे सुरूवातीपासून आघाडीवर असलेल्या जयश्री जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
Read also:
- आमदारपदी निवड झाल्याबद्दल जयश्री जाधव यांचं अभिनंदन! निवडणुक निकालाआधी लागलेत बॅनर्स
- करूणा मुंडेना कोल्हापुर पोटनिवडणुकीत अवघी 61 मत; काॅंग्रेस, भाजपविरोधात तक्रार दाखल करणार
- कोल्हापुर पोटनिवडणुक निकाल ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी घेतली आघाडी
- “राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी! ते मुस्लिम, तर हे हिंदू समाजाला भडकविण्याचं काम करताहेत”
- मुंबईसह विदर्भातील एकुण 35 कार्यकर्त्यांनी ठोकला मनसेला रामराम! मशिदीवरील प्रकरण मनसेला भोवलं