अमरावती : गेल्या काही दिवसापासून राज्यात हनुमान चालिसा पठण करण्याचा मुद्दा गाजत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात येत असून ते हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. तर तिकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेऊन हनुमान मंदिरात जाऊन हनुमान पठण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
मुंबईसह विदर्भातील एकुण 35 कार्यकर्त्यांनी ठोकला मनसेला रामराम! मशिदीवरील प्रकरण मनसेला भोवलं
मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसाचं पठण करावं. अन्य़था आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसांच पठण करणार आहेत. महाराष्ट्राला लागलेली साडेसाती दुर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी रामराज्यासारखं वागावं असा टोला देखील त्यांनी लगावला.
आदित्य ठाकरे यांचा काका राज ठाकरे यांना सल्ला !म्हणाले की, मशिदीवरील भोंग्यापेक्षा..;
आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आज अमरावती शहरातील अकोली परिसरातील वीर आज हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर रवी राणा यांनी पुजा अर्चा केली. त्यानंतर राणा दाम्पत्य आणि त्यांच्या समर्थकांनी मंदिरात बसून हनुमान चालिसा पठणास सुरूवात केली. तब्बल अर्धा पाऊण तास त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केलं त्यावेळी त्या दोघांनाही एकुण 40 वेळा हनुमान चालिसाचं पठण केलं.
हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला जाणार की नाहीत; वसंत मोरेंनी स्पष्ट सांगितलं
दरम्यानस, आज पुण्यात मनसेकडून हनुमान मंदिरात महाआरती करण्याचे आयोजन केलं आहे. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून त्यांच्या विरोधात हनुमान मंदिरात इफ्तार पार्टींच आयोजन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या हनुमान जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलं आहे.
Read also:
- 17 वी फेरीही काॅंग्रेसच्या पारड्यात ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय निश्चित
- आमदारपदी निवड झाल्याबद्दल जयश्री जाधव यांचं अभिनंदन! निवडणुक निकालाआधी लागलेत बॅनर्स
- करूणा मुंडेना कोल्हापुर पोटनिवडणुकीत अवघी 61 मत; काॅंग्रेस, भाजपविरोधात तक्रार दाखल करणार
- कोल्हापुर पोटनिवडणुक निकाल ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी घेतली आघाडी
- “राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी! ते मुस्लिम, तर हे हिंदू समाजाला भडकविण्याचं काम करताहेत”