मुंबई : काॅंग्रेस आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत तब्बल 18, 901 मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील आणि काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण व फटाक्याची आताषाबाजी करीत जल्लोष साजरा केला.
कोल्हापुर पोटनिवडणुक निकाल ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी घेतली आघाडी
या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. सत्यजित कदम आणि जयश्री जाधव यांच्यात यावेळी चांगलीच चुरस बघायला मिळाली. या पोटनिवडणुकीत 61.19 टक्के मतदान झालं त्यापैकी एकुण 2 लाख 91 हजार 978 मतदार होतं. यात एक लाख 78 हजार मतदारांनी मतदान केलं. आज झालेल्या मतमोजणीत तब्बल 26 फेऱ्यात जयश्री जाधव याच आघाडीवर होत्या . त्यात त्यांचा विजय झाला.
“राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी! ते मुस्लिम, तर हे हिंदू समाजाला भडकविण्याचं काम करताहेत”
भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर काॅंग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील यांची प्राण प्रतिष्ठा प्रणाला लागली होती. मात्र यामध्ये कोल्हापुर उत्तर भागाचा गड पालकमंत्री सतेज पाटील यांना राखण्यात यश आलं. सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावडा परिसरातील मतदार काय करणार याविषयी उत्सुकता होती. मात्र मतदारांनी सतेज पाटील यांच्याकडे कल दिला.
मुंबईसह विदर्भातील एकुण 35 कार्यकर्त्यांनी ठोकला मनसेला रामराम! मशिदीवरील प्रकरण मनसेला भोवलं
दरम्यान, कोल्हापुर निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याठिकाणी तळ ठोकून बसले होते. या निवडणुकीत आरोपांच्या फैरी जोरदार झाडल्या गेल्या. काही प्रचाराच्या ठिकाणी सभेत दगडफेक देखील बघायला मिळाली. तर मतदानाच्या आदी भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरी पैसांचे पाकिट देखील आढळून आले होते. या साऱ्या मुद्यांवर ही निवडणुक चांगलीच चुरशीची लागली होती. मात्र यात जयश्री जाधव यांचा विजय झाला.
Read also:
- कोल्हापुर पोटनिवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का?
- राणा दाम्पत्यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन! मुख्यमंत्र्यांनावरही साधला निशाणा
- 17 वी फेरीही काॅंग्रेसच्या पारड्यात ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय निश्चित
- आमदारपदी निवड झाल्याबद्दल जयश्री जाधव यांचं अभिनंदन! निवडणुक निकालाआधी लागलेत बॅनर्स
- करूणा मुंडेना कोल्हापुर पोटनिवडणुकीत अवघी 61 मत; काॅंग्रेस, भाजपविरोधात तक्रार दाखल करणार