कोल्हापुर : काॅंग्रेस आमदार चंद्राकांत जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत काॅंग्रेस, महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून या निवडणुकीच्या रिंगणात सत्यजित कदम उतरले. पहिल्या फेरीपासून तर सोळाव्या फेरीपर्यंत जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजपचा पराभव आता निश्चित मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
“राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी! ते मुस्लिम, तर हे हिंदू समाजाला भडकविण्याचं काम करताहेत”
चंद्रकांत पाटील मागील एक महिन्यापासून कोल्हापुरात ठाण मांडून बसले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणुकी महत्वाची मानली जात होती. त्यांनी कोल्हापुरात चाय पे चर्चा, अशी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोटनिवडणुकीत जिंकण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र सध्याच्या निकालावरून त्यांना या निवडणुकीत अपयश येताना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.
मुंबईसह विदर्भातील एकुण 35 कार्यकर्त्यांनी ठोकला मनसेला रामराम! मशिदीवरील प्रकरण मनसेला भोवलं
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याच्या प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्यासोबत भोसरीचे आमदार महेश लांडगे हे देखील होते. त्यामुळे गोव्यात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला दणदणीत विजय मिळवता आला. त्यानंतर कोल्हापुर पोटनिवडणुकीची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली. भाजपकडून कोल्हापूरात देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांच्या सभा पार पडल्या. मात्र पाहिजे तसं यश त्यांना आतापर्यंत मिळवता आलं नाही.
आदित्य ठाकरे यांचा काका राज ठाकरे यांना सल्ला !म्हणाले की, मशिदीवरील भोंग्यापेक्षा..;
दरम्यान, मागील एक महिन्यापासून कोल्हापुरात चंद्रकांत पाटील हे ठाण मांडून बसल्याने पुण्यात कोथरूडकरांनी त्यांच्या विरोध बॅनरबाजी देखील करण्यात आली होती. सुरूवातीपासून काॅंग्रेसने आघाडी घेतली होती. २३ व्या फेरीत काॅंग्रेसकडे १५५२५ मतांची आघाडी होती. त्यामुळे जयश्री जाधव यांचं विजय निश्चित झालं आहे.
Read also:
- राणा दाम्पत्यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन! मुख्यमंत्र्यांनावरही साधला निशाणा
- 17 वी फेरीही काॅंग्रेसच्या पारड्यात ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय निश्चित
- आमदारपदी निवड झाल्याबद्दल जयश्री जाधव यांचं अभिनंदन! निवडणुक निकालाआधी लागलेत बॅनर्स
- करूणा मुंडेना कोल्हापुर पोटनिवडणुकीत अवघी 61 मत; काॅंग्रेस, भाजपविरोधात तक्रार दाखल करणार
- कोल्हापुर पोटनिवडणुक निकाल ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी घेतली आघाडी