कोल्हापुर : काॅंग्रेस आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत तब्बल 18, 901 मतांनी विजय मिळवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकी अगोदर एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता काॅंग्रेसकडून त्यांना डिवचण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राणा दाम्पत्यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन! मुख्यमंत्र्यांनावरही साधला निशाणा
चंद्रकांत पाटिल म्हणाले की, हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. हिंदुत्व हेच पुरोगामीत्व असून सावरकर हिंदुत्ववादी होते. ते विज्ञाननिष्ठ होते. आपल्या धर्माचं पालन करताना हिंदुनी इतरांचा आदर केला पाहिजे. हिंदुत्व आमचा अजेंडा नाही तर श्वास आहे. इतर पक्षासारखी राजकीय गरज म्हणून ही भूमिका भाजपने मांडलेली नाही. या मतांमध्ये १८ हजारांचा फरक पडला आहे. ही लढत तीन पक्ष विरूद्ध एक पक्ष अशी झाली आहे.
17 वी फेरीही काॅंग्रेसच्या पारड्यात ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय निश्चित
आम्ही एकट्याने ७७ हजार मते क्राॅस केली आहेत. भाजपाने सत्ताधाऱ्यांना तोंडाला फेस आणला आहे. ही अटीतटीची निवडणुक होती. हे देशाच्या लोकशाहीचे सौदर्य आहे. भाजपानं नागरीकांनी दिलेला कौल मान्य केला आहे. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. दडपशाही, दंडुकेशाही. जातीचा वापर या सगळ्याला न घाबरत त्यांनी काम केलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
आमदारपदी निवड झाल्याबद्दल जयश्री जाधव यांचं अभिनंदन! निवडणुक निकालाआधी लागलेत बॅनर्स
दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. सत्यजित कदम आणि जयश्री जाधव यांच्यात यावेळी चांगलीच चुरस बघायला मिळाली. या पोटनिवडणुकीत 61.19 टक्के मतदान झालं त्यापैकी एकुण 2 लाख 91 हजार 978 मतदार होतं. यात एक लाख 78 हजार मतदारांनी मतदान केलं. आज झालेल्या मतमोजणीत तब्बल 26 फेऱ्यात जयश्री जाधव याच आघाडीवर होत्या . त्यात त्यांचा विजय झाला.
Read also:
- त्यांचे भोंगें कोल्हापुरकरांनीच खाली उतरवले! संजय राऊतांचा मनसे, भाजपला टोला
- “हिमालयात जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना काॅंग्रेसकडून स्वेटर, मफलर, कानटोपी देण्यात येईल”
- कोल्हापुर पोटनिवडणुकीनंतर रोहित पवारांनी भाजपवर साधला निशाणा! म्हणाले, या पराभवानंतर केंद्रीय यंत्रणा..;
- कोल्हापुरात ‘कमळ’ कोमजलं! पोटनिवडणुकीत काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधवांचा दणदणीत विजय
- कोल्हापुर पोटनिवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का?