कोल्हापुर : काॅंग्रेस आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत तब्बल 18, 901 मतांनी विजय मिळवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकी अगोदर एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता काॅंग्रेसकडून त्यांना डिवचण्यात आलं आहे.
आमदारपदी निवड झाल्याबद्दल जयश्री जाधव यांचं अभिनंदन! निवडणुक निकालाआधी लागलेत बॅनर्स
कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीत हरलो तर हिमालयात निघून जाईन असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या राज्यात जोरदार सुरू आहे. त्यावरून कोल्हापुरात निवडणुक हरलो तर हिमालयात जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना काॅंग्रेसकडून स्वेटर, मफलर, कानटोपी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीमार्फेत देण्यात येईल असं म्हटलं आहे.
करूणा मुंडेना कोल्हापुर पोटनिवडणुकीत अवघी 61 मत; काॅंग्रेस, भाजपविरोधात तक्रार दाखल करणार
तसेच पुढे फक्त ते कधी हिमालयात जायाला कधी निघणार आहेत. तेवढं त्यांनी सांगावं असं म्हणत काॅंग्रेसने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यांवर राज्यभरातून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळ चंद्रकांत पाटिल यावर काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं आता महत्वाचं ठऱणार आहे.
कोल्हापुर पोटनिवडणुक निकाल ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी घेतली आघाडी
दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. सत्यजित कदम आणि जयश्री जाधव यांच्यात यावेळी चांगलीच चुरस बघायला मिळाली. या पोटनिवडणुकीत 61.19 टक्के मतदान झालं त्यापैकी एकुण 2 लाख 91 हजार 978 मतदार होतं. यात एक लाख 78 हजार मतदारांनी मतदान केलं. आज झालेल्या मतमोजणीत तब्बल 26 फेऱ्यात जयश्री जाधव याच आघाडीवर होत्या . त्यात त्यांचा विजय झाला.
Read also:
- कोल्हापुर पोटनिवडणुकीनंतर रोहित पवारांनी भाजपवर साधला निशाणा! म्हणाले, या पराभवानंतर केंद्रीय यंत्रणा..;
- कोल्हापुरात ‘कमळ’ कोमजलं! पोटनिवडणुकीत काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधवांचा दणदणीत विजय
- कोल्हापुर पोटनिवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का?
- राणा दाम्पत्यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन! मुख्यमंत्र्यांनावरही साधला निशाणा
- 17 वी फेरीही काॅंग्रेसच्या पारड्यात ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय निश्चित