ठाणे : काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात विराट अशी उत्तर सभा घेतली. गुढी पाडव्याच्या झालेल्या सभेत राज ठाकरेंनी केलेल्या भाषणावर महाविकास आघाडी आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी काही सवाल उपस्थित केले होते. या सर्व प्रश्नांना उत्तर म्हणून ठाण्यात मनसेची उत्तरसभा घेण्यात आली.
सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार; पुत्र नीलचाही जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
या उत्तरसभेत राज ठाकरेंनी सर्वच पक्षांवर चौफेर फटकेबाजी केली. यात त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा चांगलाच खरपूर समाचार घेतला. तो मुंब्र्यातला आव्हाड हा नागासारखा फणा काढून बसला आहे. म्हणतो की मदरशांमध्ये वस्तरा तरी सापडेल का ? अरे आव्हाड वस्तरा सापडुच शकत नाही, ते दाढी करतात का ? असा खोचक सवाल राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाड यांना विचारला.
पीडित मुलीने आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, मला आनंद वाटत आहे की..;
राज ठाकरेंनी केलेल्या जहरी टीकेनंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही लगेच उत्तर दिले आहे. सध्या राज्यात स्टॅंड अप कॅामेडियनच्या जागा खाली आहेत. त्या जागा यांनी घ्याव्यात. जर माझा चेहरा नागासारखा दिसत असेल तर मला नक्कीच अभिमान आहे. तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा दिसतो हे ही पहा, असा टोला आव्हाड यांनी ठाकरेंना हाणला आहे.
पीडित तरूणीचे चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप; रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंनी जयंत पाटील यांच्याबाबतही उत्तर सभेत वक्तव्य केलं. जयंत पाटील यांचा उल्लेख ‘जंत पाटील’ असा केला. एवढंच नाही तर ते सतत आश्चर्यचकित असतात, एका चकितचंदूसारखे असा टोलाही जयंत पाटलांना हाणला. जयंत पाटील यांनीही लगेच ट्विटरवरून राज ठाकरे यांना उत्तर दिले आहे. २०१४ ला मोदींना पाठींबा, २०१९ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर घेतली आहे. राज ठाकरे हेमा. बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत ,मात्र त्यांचं नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी आहे. वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
Read also:
- ..तर हिंदू जागा झाल्यास सरकारचं अवघड होईल ; नितेश राणेंनी सरकारवर डागली तोफ
- “मुंब्र्याचा आव्हाड हा तर फणा काढलेला साप”; राज ठाकरेंनी केली आव्हाडांची नक्कल
- “राज्यात मनसेची सत्ता आल्यास अमेरिकेतून फोन येतील”; ठाण्याच्या सभेत वसंत मोरेंची तोप धडाडली
- माझा नेता कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हता; सलिम मामा शेख यांचा ठाण्यातून एल्गार
- गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी अकलेचे तारे तोडले; राज ठाकरेंचा हल्लाबोल