मुंबई : महाराष्ट्रात 18 वर्षांपुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी व इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. आता या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पत्रकारांचे देखील लसीकरण करण्याची मागणी पुढे येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून ‘पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन लसीकरण करावे’ अशी विनंती केली आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि आणि केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे.आपण ज्या पद्धतीने सर्व आरोग्य कर्मचारी,पोलीस कर्मचारी,सफाई कर्मचारी,आरोग्य pic.twitter.com/qHnUlX5D8j
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) May 10, 2021
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहार व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात राज्यभर फिरत असतात. या पत्रकार व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
हे.देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत पत्रकारांना लस दिली आहे त्यामुळे आपण देखील आपल्या राज्यातील पत्रकार व वृत्तवाहिन्याचे प्रतिनीधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Read Also :
- म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार, राजेश टोपेंची मोठी घोषणा
- “भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जातंय, मुंडेंचा झाला सर्वाधिक छळ”, खडसेंचा गंभीर आरोप
- “परदेशातून काय आलं हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनाच विचारा”, जयंत पाटलांच्या टीकेला दरेकरांचे प्रत्युत्तर
- काँग्रेसने केले मान्य, नरेंद्र मोदींनी देशाला दिल्या “या” तीन गोष्टी
- दरेकरांचा एवढा कसला महाराष्ट्र द्वेष; की त्यांना काय आरोप करावेत याचं देखील भान नाही?