मुंबई : “राज्यात लसींचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. मात्र, नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष उदभवण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकार, जाणुनबुजून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करुन देत नाही,” असा गंभीर आरोप प्रविण दरेकर यांनी रविवारी केला होता. तसेच, “लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण होऊ नये. परंतु, ठाकरे सरकार हे केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कट कारस्थान करून काम करत आहे,” अशी टीका देखील त्यांनी केली होती.
दरम्यान, त्यांच्या या टीकेला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरून ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “एकीकडे मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत , आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये,” अशी टीका त्यांनी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर केली आहे.
तस्सेच, “अशी वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय. नितीनजी गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे, ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही, वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो.” असे लिहीत त्यांनी नितीन गडकरींच्या भाषणाची लिंक देखील सोबत दिली आहे.
वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय.नितीनजी गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे , ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही, वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 10, 2021
Read Also :
- मराठा बांधवांसाठी राज्य सरकार जाणार परत सुप्रीम कोर्टात, दाखल करणार पुनर्विचार याचिका
- “नानांनी कचराच करून टाकला…”
- “हे तर पाकीटमार आणि खिसेकापू सरकार”, नवाब मलिकांचा मोदी सरकारवर घणाघात
- “नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही”; नवाब मलिकांची केंद्रावर टीका
- उजनीचे पाणी पेटले, पालकमंत्र्यांसमोरच भिडले सोलापूर आणि इंदापूरचे शेतकरी