पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीची तयारी महाविकास आघाडीकडून जोरदार सुरू आहे. त्यासाठी त्यांच्या बैठकाही पार पडत असून याबैठकांमध्ये उमेदवारी कुणाला द्यायची ? याची चर्चाही सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे या पोटनिवडणुका बिनविरोध न होता थेट लढत होण्याची शक्यता अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“सत्यजीत तांबेचा भाजपकडून गेम होणार हे अगोदरच आम्हाला माहिती होतं”
निवडणुका बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार आहे, मात्र ही विनंती मान्य करायची की नाही? हे त्यांनी ठरवायचे आहे. महाविकास आघाडीने अनेकवेळा विनंती केली, आम्ही मान्य केली. आता त्यांनी काय करायचे हे त्यांनी ठरवायचे. पण मला वाटते निवडणुका न होता बिनविरोध उमेदवारांना निवडून देणे हे सर्वांसाठी उचित राहिल असंही त्यांनी म्हटले.
“शरद पवार यांच्या काळात दाऊद मोठा होऊन निघून गेला”; गुणरत्ने सदावर्तेंची राष्ट्रवादीवर टीका
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी भाजपकडून शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. त्यातच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील जगताप यांच्या कुटूबीयांतील सदस्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं संकेत दिले आहे.
“देवेंद्र फडणवीसांनाच आम्ही सरप्राईज देणार”; जंयत पाटील
तर कसबा पेठ विधानसभा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधानंतर त्यांचे पती शैलेश टिळक यांचे नाव चर्चेत आहे. तसेच भाजपकडून गणेश बीडकर, हेमंत रासने यांचीही नावं चर्चेत आहेत. त्यामुळे कुणाला उमेदवारी देण्यात येईल. याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- शिंदेंनी बारामतीचा गड फोडला…! बारामती, दौंड, अन् इंदापुरचे कार्यकर्ते शिंदे गटात
- “मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगरांना अधिकाऱ्यांना मारण्याचा परवाना दिलाय का?” राष्ट्रवादीचा संतप्त सवाल
- ‘‘इंद्रायणी थडी’’मुळे मिळेल २० हजार महिलांच्या हाताला रोजगार! फडणवीसांकडून महोत्सवाचे कौतूक
- मुलायम सिंह यादव, झाकीर हुसेन, सुधा मुर्ती, रविना टंडन यांना पद्म पुरस्कार…! वाचा संपुर्ण यादी
- “फडणवीस साहेब…..! आमच्या पुण्याकडेही लक्ष्य द्या”, सुप्रिया सुळे