पुणे : आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचं पक्षप्रवेश होत आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीने उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला आहे. अशातच आता शिंदेंनी राष्ट्रवादीला जोरचा झटका देत बारामती, दौंड इंदापुर आणि सोलापुर येथील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
“शरद पवार यांच्या काळात दाऊद मोठा होऊन निघून गेला”; गुणरत्ने सदावर्तेंची राष्ट्रवादीवर टीका
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारामती, दौंड, इंदापुर, तसेच सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला आहे.
“देवेंद्र फडणवीसांनाच आम्ही सरप्राईज देणार”; जंयत पाटील
या सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री विजय बापू शिवतारे, प्रवक्ते किरण पावसकर, समन्वयक आशिष कुरकर्णी तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read also
- “मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगरांना अधिकाऱ्यांना मारण्याचा परवाना दिलाय का?” राष्ट्रवादीचा संतप्त सवाल
- ‘‘इंद्रायणी थडी’’मुळे मिळेल २० हजार महिलांच्या हाताला रोजगार! फडणवीसांकडून महोत्सवाचे कौतूक
- मुलायम सिंह यादव, झाकीर हुसेन, सुधा मुर्ती, रविना टंडन यांना पद्म पुरस्कार…! वाचा संपुर्ण यादी
- “फडणवीस साहेब…..! आमच्या पुण्याकडेही लक्ष्य द्या”, सुप्रिया सुळे
- “सत्यजीत तांबेचा भाजपकडून गेम होणार हे अगोदरच आम्हाला माहिती होतं”