जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजप खासदार रक्षा खडसे आणि विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. यामुळेच मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून आता राष्ट्रवादीचे नेते आणि रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांची निवड बिनविरोध होणार आहे.
भाजपच्या नेत्यांना आता लोकं कॉमेडी मॅन म्हणायला लागलेत – नाना पटोले
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रक्षा खडसे यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे खडसे विरुद्ध खडसे लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. परंतू रक्षा खडसेंचा अर्ज त्याआधीच बाद झाला आहे. एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला होता.
मतदार याद्यांमधून मुस्लीम आणि दलितांची नावे कापली जात आहेत; मंत्री जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
रक्षा खडसे यांनी मुक्ताई नगर तालुक्यातील महिला राखीव आणि इतर मागास वर्गीय मधून दोन उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र दोन्ही अर्ज हे छाननी दरम्यान बाद झाल्याने रक्षा खडसे यांचं जिल्हा बँक निवडणुकीमधून आव्हान संपुष्टात आलं आहे. रक्षा खडसे यांनी सुचका मार्फत आपले अर्ज भरले होते. नियमानुसार या अर्जावर सुचकाची सही आवश्यक असणे अनिवार्य असताना ही त्या अर्जावर नव्हती तर दुसऱ्या अर्जाचा विचार केला तर कोणत्याही सहकारी संस्थेचा दोन वर्ष सदस्य असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एक वर्ष व्यवस्थापक असणे अनिवार्य असताना या तरतुदी रक्षा खडसे यांच्याकडून पूर्ण करण्यात आल्या नसल्याचं समोर आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला असल्याचे समोर आले आहे.
Read Also :
- भाजप आमदाराच्या मॉलमध्ये राष्ट्रवादीची दुकाने; खासदार अमोल कोल्हे यांच्या समोरच पक्षाचा भांडाफोड
- पिंपरी चिंचवडच्या स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारावरून खडाजंगी; खासदार कोल्हेंच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादी ऍक्शन मोडवर
- माजी गृहमंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांचे हनीमून कुठे सुरू आहे, ते शोधा – अमृता फडणवीस
- भावना गवळी अजून किती दिवस बाहेर राहाल? ईडी कारवाईवरून किरीट सोमय्याचा निशाणा
- आर्यन खानची केस फेक आहे, पैसे उकळण्यासाठी NCB ने खोटे पुरावे सादर केले – नवाब मलिक