मुंबई : राज्यातील सध्या राजकीय वातावरण राणा दाम्पत्यामुळे चर्चेच आलं आहे. त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर रात्री भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला. त्यावरूनही राजकारण चांगलचं चिघळलं आहे. अशातच आता किरीट सोमय्यांनी राज्य सरकारवर या प्रकरणावरून धक्कादायक आरोप केले आहेत.
“नाद कुणाचाही करा, पण शिवसेनेचा नाही”; राणा दाम्पत्याला शिवसेनेचा खोचक टोला
किरीट सोमय्या म्हणाले की, शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, संजय राऊत, आणि उद्धव ठाकरे ये राजकीय नेते गंडागिरी, दादागिरी, घोटाळे करतात. किरीट सोमय्याची एफआयआर का घेतली नाही. बोगस तक्रार मुंबई पोलीसांनी का रजिस्टर केली? ड्रायव्हरने जीवावर खेळून बाहेर काढलं. या आठ कमांडोंची मारपीट झाली, असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
“पंतप्रधानांच्या दौऱ्यांचं कारण सांगून अमरावतीच्या बंटी बबलीने पळ काढला”
नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात येण्याची कल्पना पोलिसांना दिली होती. त्यांना शिवसैनिक माझ्यावर हल्ला करण्यार असल्याचंही सांगून ठेवलं होतं. त्यासंदर्भात माझ्या सुरक्षतेची जबाबदारी मला पोलिसांनी खात्री दिली. परंतु तरी देखील माझ्यावर हल्ला झाला. माझ्या गाडीवर एकच दगड लांबून पडलाय असं स्टेटमेन्ट माझ्या नावानं संजय पांडेनं दिलं आहे. याला संजय पांडेचं जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडली, उद्यापासून आंदोलन करू; चंद्रकांत पाटलांचा एल्गार
दरम्यान, किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्लाप्रकरणी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. महाराष्ट्रात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील पोलिसांच्या विश्वासहायर्तेवर प्रश्ननिर्माण झाला आहे. किरीट सोमय्या यांच्या चालकांवर गुन्हा मात्र शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
Read also:
- राजकारण तापलं! राणा दाम्पत्याला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- राणा दाम्पत्यानी पोलीस ठाण्यात 101 वेळा केलं हनुमान चालिसाचे पठण! ठाकरे सरकावर केले गंभीर आरोप
- “सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, कारण लोकशाहीत मतं मांडण्याचा तुमचा अधिकार संपला”
- चंद्रकांत दादा कुठे दिसत नाही, कुठे हिमालयात गेले की काय? अमोल मिटकरींनी घेतला उखाणा
- “साहेबांनी सांगितले म्हणून मी राऊतांना खासदार केले”; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघात