कोल्हापुर : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काॅंग्रेस संवाद यात्रेचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले होते. मागील दोन दिवसापासून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजावर केलेल्या वक्तव्यावरून चर्चेत आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करत भाजपवर हल्लाबोल केला.
एका जणाच्या गाडीवर वीस पंचवीस जण येत असाल, तर..; शेलारांनी दिला शिवसेनेला सज्जड दम
मला येताना पत्रकारांनी विचारलं की, आज मिटकरी तुम्ही भाषणांची सुरूवात श्लोकांनी करणार आहात की, शेरशायरीने करणार आहात. मी त्यांनी म्हणलो की, हसन मुश्रीफांचा हा बालेकिल्ला असल्याने मी सुरूवात एका उखान्याने करणार आहे. इवुले इवुले हरी त्याचे इवुले इवुले पाय, चंद्रकांत दादा कुठे दिसत नाही कुठे हिमालयात गेले की काय? असं म्हणताच उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावर हसु आलं.
…मग राज्याचे गृहमंत्री काय चपात्या भाजताय का? चंद्रकांत पाटलांचा रोखठोक सवाल
आज दलित आणि मराठामध्ये भांडण लावण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. शरद पवारांच्या बाबत भाजप लोकांच्या मनात द्वेष पसरवत आहे. आम्ही भक्ती करतो, परंतु भक्तीचं प्रदर्शन करीत नाही. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावर टिका करताना बनावट जातप्रमाणात बनवून खासदार झाल्याचा आरोप केला. बहुजनाचं स्वंतत्र त्यांनी हिसकावून घेतलं. धर्म काय असतो. तेच आम्हाला शिकवू नका, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आहेत तरी कुठे? शिवरायांच्या पुतळ्याच्याही अनावरणाला अनुपस्थिती
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथ शिंदे, इत्यादी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी, राजकीय नेते उपस्थित होते.
Read also:
- “साहेबांनी सांगितले म्हणून मी राऊतांना खासदार केले”; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघात
- “नाद कुणाचाही करा, पण शिवसेनेचा नाही”; राणा दाम्पत्याला शिवसेनेचा खोचक टोला
- “पंतप्रधानांच्या दौऱ्यांचं कारण सांगून अमरावतीच्या बंटी बबलीने पळ काढला”
- राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडली, उद्यापासून आंदोलन करू; चंद्रकांत पाटलांचा एल्गार
- “श्रीरामाचा अपमान करणारे मुख्यमंत्र्यांना रामभक्त जागा दाखवतील; मोदींच्या दौऱ्यामुळे आम्ही परत अमरावतीला निघालोय