औरंगाबाद : औरंगाबादमध्ये निम्म्यापेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार शिंदे गटात गेले असल्याने उद्धव ठाकरे समोर मोठं आव्हान असणार आहे. त्यात आज शिंदे गटातील पैठणचे आमदार, मंत्री संदिपान भुमरे यांनी आपल्या मतदारसंघात कर्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र मंत्रिपद मिळालं असुन देखील या कार्यक्रमाला फक्त शंभर दीडशे लोक उपस्थित होते. त्यामुळे शिंदे गटाकडे लोकांनी पठ फिरवली की काय?, अशी चिन्ह दिसत आहे.
शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करणार?; भाजपकडून हलचाली सुरू
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री संदिपान भुमरे यांच्या आजच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. सुरत, गुहावाटी, गोवा आणि मुंबई अशी देश भ्रमंती करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात आले होते. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही ठरावीक कार्यकर्त्यांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती, अशी खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
“सत्तेविना मती गेली, जो मिळाला त्याच्याशी युती केली”; मनसेचा उद्धव ठाकरेेंना टोला
विशेष म्हणजे सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरू होणार होता, तो संध्याकाळी चार वाजता सुरू झाला. गर्दी नसल्यामुळे कार्यक्रम उशिरा सुरू करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र तरी देखील या कर्यक्रमाला जनतेने पाठ फिरवली असल्याचं दिसत आहे.
“उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही”; नवनीत राणांचा ठाकरेंना टोला
तर दुसरीकडे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांनी दौरा केला होता त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली होती. या सभेसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी सभेची जंगी तयारी केली होती. पण मंत्री भुमरे यांच्या आजच्या सभेला गर्दी न जमल्याने शिंदे गटाकडे जनता पाठ फिरवत आसल्याचं चिन्ह दिसत आहे.
Read also
- “झंडू बाम घेऊन ठेवा”; संभाजी ब्रिगेडचा भाजपवर हल्लाबोल
- “हेच अडाणी लोक महाराष्ट्राचे वाटोळे करणार”; रूपाली ठोंबरे-पाटील
- “केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये”; पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षाला घरचा आहेर
- “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रडीचा डाव सुरू!”; किशोरी पेडणेकर
- पुन्हा मोदीच! जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी अव्वलस्थानी