सातारा : एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेले अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांची न्यायालयाने पुन्हा 14 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना दिलासा मिळला असून त्यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. अशातच आता गुणरत्ने सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
“बहुजन समाजाचं नेतृत्व बाहेर यायला लागलं की, त्याला दाबायचं काम पवार कुटुंबीय करतं”
साताऱ्यात गुणरत्ने सदावर्ते यांनी एका दिलेल्या न्यूज चॅनलेच्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापुरचे छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आपेक्षार्ह व्यक्तव्य केलं होतं. या प्रकरणी त्यांच्यावर राजेंद्र निकम यांनी ऑक्टोबर 2020 रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्यांना चौकशीसाठी वारंवार बोलवण्यात आलं. परंतु प्रत्येक वेळी गुणरत्न सदावर्ते गैरहजर राहिल्याने त्यांचा ताबा आता सातारा येथील पोलिसांनी घेतला असून त्यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
3 मे पर्यंत भोंगे उतरावा, अन्यथा..! नाशिक पोलीस आयुक्तांनी दिला भोंग्यांबाबत अल्टिमेटम
याप्रकरणी सातारा येथील पोलिसांनी गिरगाव न्यायालयात अर्ज सादर केला होता. तो न्यायालयाने मंजूर केल्यानंतर गुणरत्ने सदावर्तेंना सातारा येथील पोलिस घेऊन गेलेत. त्याआधी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर मुंबई, सातारा , कोल्हापुर आणि बीडमध्ये देखील गुन्हे नोंद झाले आहेत. त्याआधी दिलेली तीन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालायने त्यांना परत 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे.
“हार नहीं मानुंगा, रार नहीं ठानुंगा”! चंद्रकांत पाटलांचं ते ट्विट चर्चेत
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक हल्ला केला. त्या हल्ल्यामागे गुणरत्ने सदावर्ते यांचा हात असल्याचा आरोप ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. अशातच आता सदावर्ते यांची रवानगी न्यायालयीने कोठडीत नेण्यात आलं. त्यावेळी त्यांनी उदयनराजेंसारखी काॅलर उडवली. त्यांची ही काॅलर उडल्याची स्टाईल सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे.
Read also:
- मुंबई, सातारा, कोल्हापुर, बीड सदावर्तेंचा पुढचा मुक्काम ठरला! 14 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली
- ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, म्हणत पीएफआयचा इशारा! राज ठाकरेंना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?
- आग विझवण्याऐवजी भडकवणाऱ्यांना त्याची काय किंमत कळणार? खोतांचा रोहित पवारांना प्रत्युत्तर
- “एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय”; भाजप नेत्याचा एकनाथ खडसेंना टोला
- “सत्ता गेल्यानं विरोधकांची प्रमाणापेक्षा जास्त तडफड”; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला