नाशिक : राज्यात भोंग्यांचं राजकारण सुरू असताना नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी घ्यावी लागणार असल्याचे आदेश दीपक पांडे यांनी दिले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची ही पहिली ठिणगी नाशिक शहरात पडली असल्याचं बोललं जात आहे. दीपक पांडे यांनी त्यापद्धतीचे आदेश देखील पोलिसांना दिले आहेत.
“भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
येत्या 3 मे पर्यंत भोंग्यांसंबंधी परवानगी न घेतलेल्या संबंधित अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच कुठल्याही मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालिसा म्हणण्यास मनाई करण्यात आली आहे. अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावता येणार नाही. मशिदीत अजान होण्याच्या 15 मिनिटे आधी हनुमान चालीसा लावता येईल. धार्मिक स्थळांवर कोणत्याही कार्यक्रमासाठी भोंगे लावायचे असल्याच त्यासाठी परवानगी आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांच्याबाबात मोठी अपडेट! न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 3 तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा इशारा देण्यात आला आहे. जर मशिदीवरील भोंगे खाली उतरवले नाही तर त्याच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. त्याचे पडसाद राज्यात काही ठिकाणी पडताना दिसत आहेत. त्यामुळे भोंग्यांचं राजकारण आता पेटण्याची शक्यता आहे.
भाजप आमदार गणेश नाईकांविरोधात महिलेची तक्रार दाखल! जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांच्या राजकारणांनी महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यासाठी गृहमंत्र्यांने देखील पोलिसांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची याबाबत बैठक होत असून त्यात महत्वपुर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Read also:
- “हार नहीं मानुंगा, रार नहीं ठानुंगा”! चंद्रकांत पाटलांचं ते ट्विट चर्चेत
- “राज ठाकरेंना आता जाग आलीय, परंतु त्यांनी आता जागचं राहवं”; किशोरी पेडणेकरांचा टोला
- महागाईच्या झळा सोसेना अन् भोंग्यांचं राजकारण काही संपेना
- राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांबाबतचा अल्टिमेटम! राज्य सरकारने घेतला धसका
- राणा दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत! शिवसैनिकांनी दिलेलं चॅलेज पुर्ण करणार का?