मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात राजकीय वातावरण वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आलं आहे. अलिकडेच साताऱ्यात माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता अजून एक भाजपा आमदारवर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांवर सध्या बिकट संकंटाची परिस्थिती ओढावली आहे.
“हिमालयात जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना काॅंग्रेसकडून स्वेटर, मफलर, कानटोपी देण्यात येईल”
नवी मुंबईतील ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. 2021 मध्ये गणेश नाईक यांनी आपल्यावर बंदुक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली होती. असा आरोप संबंधित महिलेने केला आहे. मी गणेश नाईक यांच्यासोबत 27 वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. यामधून आम्हाला एक मुलगा देखील झाला आहे. या मुलास त्यांच्या वडिलांचं नाव दिलं जाव अशी मागणी त्यांच्याकडे मी केली. मात्र गणेश नाईक यांनी मला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं त्या महिलेने म्हटलं आहे.
संबंधित महिलेने या प्रकऱणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय या महिलेकडून राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आलेली आहे. तर गणेश नाईक यांनी स्वत: ची डीएनची चाचणी करून यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
कोल्हापुरात ‘कमळ’ कोमजलं! पोटनिवडणुकीत काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधवांचा दणदणीत विजय
दरम्यान, जयकुमार गोरे यांच्यावर महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अन्य 4 साथीदारांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. याची माहिती दहिवडी पोलिस उप विभागीय अधिकारी निलेश देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Read also:
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांचा चिमटा! म्हणाले, मी त्यांच्यासोबत जाणार
- “बजरंग बली हनुमान कधीच ‘महागाईच्या रावणा’ची साथ देऊ शकणार नाही”
- “डरपोक भाजपचा कणखर मतदारांनीच कपडे फाडले”; नाना पटोलेंची भाजपवर टीका
- “निवडणुकीत भाजपाने सत्ताधाऱ्यांना तोंडाला फेस आणला”; पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- त्यांचे भोंगें कोल्हापुरकरांनीच खाली उतरवले! संजय राऊतांचा मनसे, भाजपला टोला