पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या आणि त्यानंतर झालेल्या ठाण्यातील सभेत हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार लावून धरला. त्याचबरोबर त्यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात आक्रमक पवित्रा घेत मशिदीसमोर हनुमान चालिसा लावणार असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या कडक भुमिकेमुळे राज्यातील राजकारण पेटलंच परंतु पीएफाय सारख्या संघटनांकडून त्यांना आता धमक्या यायाला लागल्या आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर येतय. याच पार्श्वभूमीवर त्यांना आता केंद्राची सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे.
“हार नहीं मानुंगा, रार नहीं ठानुंगा”! चंद्रकांत पाटलांचं ते ट्विट चर्चेत
येत्या 3 तारखे पर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरवले नाही तर त्याच्या दुप्पट आवाजात मशिदीसमोरच हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यांच्या या आव्हांना प्रतिसाद म्हणून राज्यात मनसैनिकांनी भोंगे देखील लावलेत. तर भाजपनेते मोहित कंबोज यांनी भोंगे मोफत देणार असल्याचं जाहिर केलं. यावरून त्यांच्यावर सत्ताधारी पक्षांनी टिकास्त्र सोडलं.
“राज ठाकरेंना आता जाग आलीय, परंतु त्यांनी आता जागचं राहवं”; किशोरी पेडणेकरांचा टोला
भाजप हा हिंदुत्वादी विचारधारा असणार पक्ष आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आडून आभजप जहाल हिंदुत्वाला खतपाणी घालत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेली भुमिका आणि त्यानंतर राज्यात पडणारे पडसाद पाहता पीएफआय संघटनेने राज ठाकरेंना इशारा दिला आहे. छेडोगे तो छोडेंगे नहीं अस म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. हे सर्व पाहता केंद्र सरकार राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
महागाईच्या झळा सोसेना अन् भोंग्यांचं राजकारण काही संपेना
दरम्यान, राज ठाकरे यांनी अलिकडेच वादळी सभा घेतल्या. त्यानंतर आता 3 मे रोजी राज ठाकरे औरंगाबाद याठिकाणी सभा घेणार आहेत. तर येत्या 5 जुन रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेतील सर्व कार्यकर्ते प्रभू रामाचं दर्शन घेणार असल्याचं राज ठाकरे यांनीच जाहीर केलं आहे.
Read also:
- आग विझवण्याऐवजी भडकवणाऱ्यांना त्याची काय किंमत कळणार? खोतांचा रोहित पवारांना प्रत्युत्तर
- “एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय”; भाजप नेत्याचा एकनाथ खडसेंना टोला
- “सत्ता गेल्यानं विरोधकांची प्रमाणापेक्षा जास्त तडफड”; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
- “बहुजन समाजाचं नेतृत्व बाहेर यायला लागलं की, त्याला दाबायचं काम पवार कुटुंबीय करतं”
- 3 मे पर्यंत भोंगे उतरावा, अन्यथा..! नाशिक पोलीस आयुक्तांनी दिला भोंग्यांबाबत अल्टिमेटम