मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होत आहे. यावेळी राज्यसभेची निवडणुकीमध्ये 6 जागासाठी 7 उमेदवार मैदानात असल्याने ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. मात्र अशातच महाविकास आघाडीने जर या निवडणुकीत एक उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप सामजंस्याची भूमिका घेऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे.
भाजपने आयोजित केलेल्या स्पर्धेत ‘राष्ट्रवादीचा जलवा’ ; आमदार सुनील शेळकेंनी जिंकली 12 लाखांची बोलेरो
शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी तर भाजपकडून धनंजय महाडिक यांना 6 व्या जागेसाठी उमेदवारी दिली आहे. म्हणून यामधून कोणता तरी एक नेत्याला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. मात्र जर महाविकास आघाडीकडून जर एक उमेदवार मागे घेतला तर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप सामजस्यांची भूमिका घेणार असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. जर असं झालं नाही तर राज्यसभेच्या निवडणुकीसारखीच विधान परिषदेची निवडणुक ही बिनविरोध होणार नाही.
“विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”
राज्यसभेची निवडणुक झाल्यानंतर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी देखील निवडणुक होणार आहे. विधान परिषदेच्या संख्याबळानुसार भाजपच्या 4 जागा सहज निवडून येतात. मात्र महाविकास आघाडीने या निवडणुकीत एक उमेदवार मागे घेतला नाहीतर भाजप पुढच्या निवडणुकीत 5 उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत महाविकास आघाडी काय निर्णय घेणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल”; करूणा शर्माच्या दाव्याने खळबळ
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी एका उमेदवाराला 27 मतांची आवश्यकता असते. त्यामुळे राष्ट्रवादीकडे 54, शिवसेनेकडे 56 आणि काॅंग्रेसचे 45 आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी 2 तर काॅंग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत कशा पद्धतीच्या राजकीय घडामो़डी घडतात ते आता पहावं लागणार आहे.
Read also:
- भाजपचे महाडिक विजयी होणार, आणि महाविकासआघाडीचा बडा नेता घरी बसणार
- राज्यसभा निवडणूकिसाठी फडणवीसांची मोर्चेबांधणी, अपक्ष आमदरांना गळाला लावणार?
- राज्यसभा निवडणुक; नवाब मलिक, अनिल देशमुखांसाठी अजित पवार न्यायालयात जाणार ?
- “संभाजीनगरच्या”टोमणे सभेत”ढोंगी हिंदुत्ववादी उत्तर देणार का?” सभेआधी मुख्यमंत्र्यांना मनसेने डिवचलं
- “मोदींच्या नेतृत्वाखाली एक छोटासा सैनिक म्हणून काम करणार”; हार्दिक पटेल