नवी दिल्ली : काॅंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे एकेकाळी भाजपवर आरोपांची गरळ ओकणारा नेता भाजपमध्ये जात असल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी आज एक ट्विट करत सर्वात यशस्वी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मी देशसेवा करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्याला आगामी निवडणुकीत विधानसभेची उमेदवारी देखील देण्याची शक्यता आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक आणि देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?
राष्ट्रहित, प्रदेशहित, जनहित एवं समाज हित की भावनाओं के साथ आज से नए अध्याय का प्रारंभ करने जा रहा हूॅं. भारत के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में चल रहे राष्ट्र सेवा के भगीरथ कार्य में छोटा सा सिपाही बनकर काम करूॅंगा, अंस म्हणत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज गुजरातमधील भाजपच्या नेत्यांच्या उपस्थित ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
“गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
हार्दिक पटेलने अलिकडेच काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवून काॅंग्रेस पक्षातून राजीनामा देत असल्याचं म्हटलं होतं. त्या पत्रात हार्दिक पटेलने काॅंग्रेस नेतृत्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच गुजरातमधील ज्येष्ठ नेत्यांवर देखील त्यांनी गंभीर आरोप केले. काॅंग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर त्यांनी हातात कमळ बांधणार असल्याचं निश्चित केलं आहे.
लोकसभेच्या मैदानात नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदे उतरणार?
गुजरातमध्ये येत्या डिसेंबर महिन्यात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. यावेळी भाजपला गुजरातमध्ये सत्ता राखण्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण त्यांना काॅंग्रेस आणि आप जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्ष गुजरात हे भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे सध्या गुजरातमध्ये राजकीय घडामोडी जोरदार घडताना दिसत आहेत.
राष्ट्रहित, प्रदेशहित, जनहित एवं समाज हित की भावनाओं के साथ आज से नए अध्याय का प्रारंभ करने जा रहा हूँ। भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र भाई मोदी जी के नेतृत्व में चल रहे राष्ट्र सेवा के भगीरथ कार्य में छोटा सा सिपाही बनकर काम करूँगा।
— Hardik Patel (@HardikPatel_) June 2, 2022
Read also:
- भाजपने आयोजित केलेल्या स्पर्धेत ‘राष्ट्रवादीचा जलवा’ ; आमदार सुनील शेळकेंनी जिंकली 12 लाखांची बोलेरो
- “विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”
- “मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल”; करूणा शर्माच्या दाव्याने खळबळ
- “हिमालय संकटात होता, तेव्हा त्याच्या मदतीला ‘सह्याद्री’ धावून आला, तसेच काॅंग्रेसलाही..;” नाना पटोले
- “खैरे यांनीच आम्हाला भाजपकडून पैसे आणून दिले”; इम्तियाज जलील यांचा खैरेंना जोरदार टोला