अहमदनगर : जेव्हा जेव्हा हिमालय संकटांत येतो, तेव्हा सह्याद्री हा त्याच्या मदतीला धावुन आला आहे. यशवंतराव चव्हाणांपासून अनेक नेत्यांचा इतिहास याठिकाणी खुप मोठा आहे. आज देशातील सर्वभौमत्वता, संविधान भाजपकडून तोडले जात आहे. त्याला आपल्याला वाचावयाला हवे. देशातील सार्वजनिक संपत्ती विकण्याचे काम भाजप करीत आहेत. असा आरोप काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. शिर्डी येथे अयोजित केलेल्या काॅंग्रेस शिबिरात ते बोलत होते.
“यांचा तो बाळ्या, लोकांचे ते कार्टे, ही भूमिका नाही चालणार”; रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच मी भविष्य वक्ता नाही, ते विरोधी पक्षात भविष्यवाण्या करणारे खुप आहेत. ते रोज सरकार पाडण्याची तारखा सांगतात. रोज झेंडा फडकवतात. अशी भविष्यवाणी मला करता येत नाही. वस्तुस्थितीला समजून आमचे मत त्या दिवशी व्यक्त केले. चारही उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदान संख्यांचा पाठबळ महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे ते निश्चितच निवडून येतील असंही नाना पटोले म्हणाले.
“बैलगाडा शर्यती अखंडित सुरू राहण्यासाठी जीवाची बाजी लावू,पण शर्यत कदापि बंद होवू देणार नाही”
जयपुर याठिकाणी घेण्यात आलेल्या शिबिराच्या धर्तीवर आजचं शिबीर घेण्यात आलं आहे. तसेच येणाऱ्या काही काळात प्रत्येक जिल्ह्यात अशाप्रकारे शिबिरं घेण्यात आली पाहिजे. त्यातून महाराष्ट्रातील प्रत्येक काॅंग्रेसच्या कार्यकर्ता उभारी घेईल, असंही सचिन सावंत म्हणाले. सध्या केंद्र सरकारकडून विविध गोष्टीचं विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे माणसा माणसाला धर्म,जात, भाषा, प्रांत या गोष्टीच्या पलीकडे जाऊन जोडणे हा या नवसंकल्प कार्यशाळेचा मुख्य गाभा आहे. असं मत अतुल लोंढे यांनी व्यक्त केले.
“बैल काही एकटा येत नाही, जोडीने येतो, ते पण नांगरसकट”; बैलगाडा शर्यतीत फडणवीसांचा हुंकार
तसेच काही पक्ष जे सांप्रदायिक आहेत. त्यांचं म्हणण आहे की समाज तोडो पण काॅंग्रेसचा नारा हा समाज जोडोचा आहे. असं नसीम खान यांनी म्हटलं. तर काॅंग्रेस एक विचार आहे. चळवळ आहे आणि काॅंग्रेसचं देश बांधू शकतो, एकत्रित ठेवू शकतो आणि सामान्य, गरीब माणसाचं कल्याण करू शकतो, असं बाळासाहेब देशमुख यांनी सांगितलं.
Read also:
- “खैरे यांनीच आम्हाला भाजपकडून पैसे आणून दिले”; इम्तियाज जलील यांचा खैरेंना जोरदार टोला
- न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक आणि देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?
- “गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
- लोकसभेच्या मैदानात नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदे उतरणार?
- “जीएसटीचे पैसे पेट्रोल, डिझेल कर कपातीसाठी आले नाहीत”; अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं