अमरावती – हनुमान चालिसा पठाणाच्या मुद्द्यावरुन चर्चेत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आगामी लोकसभा निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर सतत टीका करणाऱ्या नवनीत राणांविरोधात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी २०२४ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून केला जात आहे.
“काॅंग्रेसकडून प्रतापगढ़ींना राज्यसभेची उमेदवारी जाहीर”; पटोले म्हणाले, “कोणीही नाराज नाही”
नवनीत राणा यांच्याविरोधात आमदार प्रणिती शिंदे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून २०२४ची निवडणूक लढवावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी प्रणिती शिंदेंना लिहले आहे. आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केल्यास २०२४मध्ये अमरावतीमध्ये काँग्रेसचा खासदार निवडून येऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे. या पत्रानंतर प्रणिती शिंदे कुठली भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
“निवडणुक झाली तर स्वागत नाही तर डबल स्वागत”; राज्यसभेच्या निवडणुकीबाबत राऊतांचं सुचक वक्तव्य
दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत नवनित राणा खासदारम्हणून निवडून आल्या आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अडसूळ यांचा पराभव केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. तत्पूर्वी २०१४मध्येही नवनित राणा यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना अडसूळ यांनी त्यांना पराभूत केले होते.
Read also:
- “जीएसटीचे पैसे पेट्रोल, डिझेल कर कपातीसाठी आले नाहीत”; अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं
- “यांचा तो बाळ्या, लोकांचे ते कार्टे, ही भूमिका नाही चालणार”; रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
- “बैलगाडा शर्यती अखंडित सुरू राहण्यासाठी जीवाची बाजी लावू,पण शर्यत कदापि बंद होवू देणार नाही”
- “बैल काही एकटा येत नाही, जोडीने येतो, ते पण नांगरसकट”; बैलगाडा शर्यतीत फडणवीसांचा हुंकार
- राज्यसभा उमेवारीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य..कॉंग्रेस सरचिटणीसांनीच दिला राजीनामा