पुणे : केंद्र सरकारने परतावा केलेले जीएसटीचे पैसे हे पेट्रोल आणि डिझेल कर कपात कमी करण्यासाठी आलेले नाहीत. ते पैसे राज्याच्या विकास कामांसाठी आहेत, असं रोखठोक मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले आहे. केंद्र सरकारने अलिकडेच देशातील विविध राज्यांना जीएसटीचे पैसे परत केले आहेत. त्यात महाराष्ट्राला सर्वाधिक 14 कोटी रूपये मिळाले आहेत. यावरून विरोधकांना अजित पवार यांनी चांगलंच सुनावलं.
केंद्र सरकारने पाठवलेले पैसे हे मागच्या काळात येणारे पैसे होते. हे सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे या पैशाचा आणि पेट्रोल डिझेल कर कपातीचा काहीच संबंध नाही. राज्यात अनेक समस्या आहेत. तसेच राज्याचा गाडा देखील व्यवस्थित चालला पाहिजे आणि अडचणीत सापडलेल्या प्रत्येक माणसाला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे मध्यंतरी आम्ही देखील पेट्रोल डिझेलवरील कर कपात केली आहे. असंही ते म्हणाले.
“चौंडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही”; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांविरोधात एल्गार
केंद्र सरकारकडे 29 कोटी रूपये हे राज्य सरकारकडे होते. त्यातील काही पैसे राज्याला मिळाले आहेत. बाकीचे लवकरात लवकर मिळावेत इतकीच माफक इच्छा आहे. राज्य सरकारविरोधात भाजप सातत्याने टिका करीत असतात. त्यामुळे अजित पवार यांनी भाजला चांगलंच सुनावलं आहे.
दरम्यान, तसेच केंद्र सरकारने सर्वच राज्यांना जीएसटीचा परतावा दिला असून महाराष्ट्राला सर्वाधिक 14, 145 कोटी रूपये मिळाले आहेत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. तसेच महाविकास आघाडी सरकारने आता केंद्राकडे बोट दाखवायला नवे विषयय शोधावे, आणि पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून जनतेला लुबाणंही बंद करावं, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “यांचा तो बाळ्या, लोकांचे ते कार्टे, ही भूमिका नाही चालणार”; रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
- “बैलगाडा शर्यती अखंडित सुरू राहण्यासाठी जीवाची बाजी लावू,पण शर्यत कदापि बंद होवू देणार नाही”
- “बैल काही एकटा येत नाही, जोडीने येतो, ते पण नांगरसकट”; बैलगाडा शर्यतीत फडणवीसांचा हुंकार
- राज्यसभा उमेवारीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य..कॉंग्रेस सरचिटणीसांनीच दिला राजीनामा
- “तुमच्या आमदाराने याठिकाणी खुप चांगलं काम केलंय”; शरद पवारांकडून रोहित पवारांचं कौतुक