अहमदनगर : देशातील लोकशाहीवर ज्या पद्धतीचं आक्रमण होत आहे. महात्मा गांधीचा भारत आज विकृत अवस्थेमध्ये चालला आहे. त्यामुळे आता काॅंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचना त्याविरोधात लढाई ही लढावीच लागणार आहे. काॅंग्रेससमोर जी काही संकंट आली आहेत. त्यासाठी कशापद्धतीची पुढील दिशा असायला हवी. यासाठी आजचं शिबिर घेण्यात आलं आहे. असं मत काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मांडले आहे. अहमदनगर याठिकाणी काॅंग्रेसचं आज शिबिर घेण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यसभा उमेवारीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य..कॉंग्रेस सरचिटणीसांनीच दिला राजीनामा
जयपुर याठिकाणी घेण्यात आलेल्या शिबिराच्या धर्तीवर आजचं शिबीर घेण्यात आलं आहे. तसेच येणाऱ्या काही काळात प्रत्येक जिल्ह्यात अशाप्रकारे शिबिरं घेण्यात आली पाहिजे. त्यातून महाराष्ट्रातील प्रत्येक काॅंग्रेसच्या कार्यकर्ता उभारी घेईल, असंही सचिन सावंत म्हणाले. सध्या केंद्र सरकारकडून विविध गोष्टीचं विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे माणसा माणसाला धर्म,जात, भाषा, प्रांत या गोष्टीच्या पलीकडे जाऊन जोडणे हा या नवसंकल्प कार्यशाळेचा मुख्य गाभा आहे. असं मत अतुल लोंढे यांनी व्यक्त केले.
“काॅंग्रेसकडून प्रतापगढ़ींना राज्यसभेची उमेदवारी जाहीर”; पटोले म्हणाले, “कोणीही नाराज नाही”
तसचे काही पक्ष जे सांप्रदायिक आहेत. त्यांचं म्हणण आहे की समाज तोडो पण काॅंग्रेसचा नारा हा समाज जोडोचा आहे. असं नसीम खान यांनी म्हटलं. तर काॅंग्रेस एक विचार आहे. चळवळ आहे आणि काॅंग्रेसचं देश बांधू शकतो, एकत्रित ठेवू शकतो आणि सामान्य, गरीब माणसाचं कल्याण करू शकतो, असं बाळासाहेब देशमुख यांनी सांगितलं.
“निवडणुक झाली तर स्वागत नाही तर डबल स्वागत”; राज्यसभेच्या निवडणुकीबाबत राऊतांचं सुचक वक्तव्य
दरम्यान, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षेतखाली आज काॅंग्रेसचं अधिवेशन शिर्डी याठिकाणी पार पडलं. त्यावेळी काॅंग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या शिबिराला उपस्थित होते. मागील काही दिवसांच्या राजकीय घडामोडी बघता काॅंग्रेसला उतरती कळा लागली आहे. मात्र ही उतरती कळा पुन्हा वरच्या दिशेने नेँण्यासाठी काॅंग्रेसकडून सध्या अधिवेशन घेतले जात आहेत.
Read also:
- लोकसभेच्या मैदानात नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदे उतरणार?
- “जीएसटीचे पैसे पेट्रोल, डिझेल कर कपातीसाठी आले नाहीत”; अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं
- “यांचा तो बाळ्या, लोकांचे ते कार्टे, ही भूमिका नाही चालणार”; रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
- “बैलगाडा शर्यती अखंडित सुरू राहण्यासाठी जीवाची बाजी लावू,पण शर्यत कदापि बंद होवू देणार नाही”
- “बैल काही एकटा येत नाही, जोडीने येतो, ते पण नांगरसकट”; बैलगाडा शर्यतीत फडणवीसांचा हुंकार