मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण करूणा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पु्न्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
“जीएसटीचे पैसे पेट्रोल, डिझेल कर कपातीसाठी आले नाहीत”; अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं
धनंजय मुंडे दहा नंबरचा वापर करून बोलत असतात. एका वेश्याचेही दहा नंबर नसतात. मग मुंडे नेमके कुणाशी बोलतात? मी खंडणी मागते असे आरोप त्यांनी माझ्यावर केले आहेत. तसेच मी 5 कोटीच्या घरात राहत असून अडीच कोटीचे कर्ज माझ्यावर आहे. तसेच माझ्या सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेतलं आहे. यातून मी धनंजय मुंडे यांना 1 कोटी रूपये दिले आहेत. वेळोवेळी मुंडेंच्या सांगण्यावरून त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांना पैसे दिले आहेत. असंही ते म्हणाल्या.
“यांचा तो बाळ्या, लोकांचे ते कार्टे, ही भूमिका नाही चालणार”; रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेस खासदार सुप्रिया सुळेंकडेही अनेकदा न्यायासाठी विनंती केली. परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली होती. मात्र सगळे नेते गप्प बसले होते. तसेच धनंजय मुंडे यांनी इतर महिलांनाही दबाव टाकून गप्प केले आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर माझ्या बहिणीने केलेेले आरोप लवकरच त्यासंदर्भात ती पुरावा देणार असल्याचंही करूणा शर्माने म्हटलं आहे.
“बैलगाडा शर्यती अखंडित सुरू राहण्यासाठी जीवाची बाजी लावू,पण शर्यत कदापि बंद होवू देणार नाही”
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर करूणा शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप केले होते. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. तसेच कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत देखील करूणा शर्माने उमेदवारी अर्ज सादर केला होता.
Read also:
- “हिमालय संकटात होता, तेव्हा त्याच्या मदतीला ‘सह्याद्री’ धावून आला, तसेच काॅंग्रेसलाही..;” नाना पटोले
- “खैरे यांनीच आम्हाला भाजपकडून पैसे आणून दिले”; इम्तियाज जलील यांचा खैरेंना जोरदार टोला
- न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक आणि देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?
- “गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
- लोकसभेच्या मैदानात नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदे उतरणार?