पुणे : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मातब्बर नेते माजी आमदार विलास लांडे यांचा आज वाढदिवस… यानिमित्ताने ‘पॉलिटिकल महाराष्ट्र’कडून त्यांना हार्दिक शुभेच्छा…
पिंपरी-चिंचवडचे राजकारण माजी आमदार विलास लांडे यांच्याशिवाय पूर्ण होवू शकत नाही. राज्यातील बड्या नेत्यांच्या थेट संपर्कात असलेला हा स्वाभिमानी नेता आता पक्षातील अतिमहत्वाकांक्षी लोकांमुळे अडगळीत पडला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, कालच आरक्षण सोडत झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेची भाकरी फिरवण्याची ताकद असलेल्या लांडे यांचा आज वाढदिवस.
लोकसभेच्या मैदानात नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदे उतरणार?
मात्र, शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने लांडे यांच्या वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन ’केले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून लांडे यांचा वाढदिवस फ्लेक्स, कार्यक्रम, उपक्रमांनी दिमाखात साजरा होतो. मात्र, यावर्षी काय अडचण झाली अन् लांडे यांना शुभेच्छा देणारा साधा फ्लेक्सही समर्थकांनी लावला नाही. याला काही अपवाद निश्चित आहेत. पण, अपेक्षेप्रमाणे लांडे समर्थकांनी शक्तीप्रदर्शन केले नाही किंवा तशा सूचना लांडे यांनी स्वत: दिल्या होत्या काय? असाही प्रश्न अनुत्तरीत आहेत. विशेष म्हणजे, एक-दोन समर्थकांनी विलास लांडे यांच्या प्रेमापोटी वृत्तपत्रांमध्ये जाहीराती देत शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला. एकेकाळी भोसरीसह पिंपरी-चिंचवड बेताज बादशाह असलेल्या लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त एकही विधायक कार्यक्रम घेता आला नाही, याबाबत शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि किमान भोसरी मतदार संघातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.
“जीएसटीचे पैसे पेट्रोल, डिझेल कर कपातीसाठी आले नाहीत”; अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं
अजित गव्हाणे उपकार विसरले…?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे यांची निवड दोन महिन्यांपूर्वी झाली. वास्तविक, शहराध्यक्षपदी माजी आमदार विलास लांडे यांना संधी मिळावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गव्हाणे यांच्या गळ्यात माळ घातली. यावर, मनाचा मोठेपणा दाखवत लांडे यांनी गव्हाणेच माझे राजकीय वारसदार आहेत, असे जाहीर केले. शहराध्यपदी संधी मिळाल्यानंतर गव्हाणेंची महत्त्वाकांक्षा वाढली. त्यांनी सोयीस्करपणे लांडे यांना साईडट्रॅक करायला सुरूवात केली. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदारकीची स्वप्ने पडू लागल्यामुळे शहराध्यक्षांनी शहरातील ज्येष्ठ नेत्यांचा वाढदिवसही साजरा केला नाही. अजित गव्हाणे यांची राजकीय कारकिर्द बहरली ती लांडेंच्या बोटाला धरुनच. मात्र, वेळ बदलली तसे गव्हाणेसुद्धा बदलले. त्यामुळे अजित गव्हाणे लांडेंचे उपकार विसरले का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
“यांचा तो बाळ्या, लोकांचे ते कार्टे, ही भूमिका नाही चालणार”; रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
लांडे यांनी कावेबाजांना ओळखावे…
माजी आमदार विलास लांडे यांनी आतापर्यंतच्या राजकारणात अनेक कुरघोड्या केल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यांना अशी भूमिका का घ्यावी लागली? कुणाच्या सांगण्याने लांडे यांनी निर्णय घेतले? याच्याही खोलात गेले पाहिजे. क्षमता असतानाही पक्षश्रेष्ठींनी संधी दिली नाही, तर लांडेंनी तरी कारावे? हा प्रश्न आहे. आगामी काळात विलास लांडे यांनी स्वाभिमान जपला पाहिजे. १० वर्षे सभागृहात पिंपरी-चिंचवडचा स्वाभिमानी आवाज घुमवणाऱ्या माजी आमदार विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे आणि पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी, अशी अपेक्षा लांडे समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
Read also:
- “मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल”; करूणा शर्माच्या दाव्याने खळबळ
- “हिमालय संकटात होता, तेव्हा त्याच्या मदतीला ‘सह्याद्री’ धावून आला, तसेच काॅंग्रेसलाही..;” नाना पटोले
- “खैरे यांनीच आम्हाला भाजपकडून पैसे आणून दिले”; इम्तियाज जलील यांचा खैरेंना जोरदार टोला
- न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक आणि देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?
- “गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य