सातारा : अजित पवार आमचे नेते आहेत, अन् राष्ट्रवादीत कोणतीही फुट पडली नाही. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संपुर्ण राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर अनेक राजकीय नेत्यांनी याचा वेगळा अर्थ काढला. त्यावर आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावर आता काॅंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाष्य केलंय.
हेही वाचा…“काॅंग्रेसमधील काही ठराविक लोकांनी टार्गेट करून पक्षाच्या बाहेर काढलं”,सत्यजीत तांबेंचा आरोप
भाजपने तोडफोडीचे राजकारण करत विरोधी पक्ष फोडण्याचे पाप केले आहे. भाजपने आधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडले व कटकारस्थान करून एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरही तेच केले पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सक्षम व राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले नेते आहेत. अजित पवार यांच्या गटाला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. शरद पवार यांचे राजकारण पाहता भारतीय जनता पक्षाला ते कात्रजचा घाट दाखवतील, असा इशारा अतुल लोंढे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची ‘नो कमेंट्’
दरम्यान, अजित पवार आमचे नेते आहेत. असं सुप्रिया सुळे म्हणू शकते, मी नाही. राष्ट्रवादीत फुट नाही. परंतु त्यांची भूमिका ही पक्षविरोधी आहे. अजित पवार आमचे नेते असं म्हणलोच नव्हतो, असं म्हणत शरद पवार यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे. आज सातारा दौऱ्यावर असतांना दहिवडे याठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. अजित पवारांना पुन्हा संधी नाही. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी संधी देण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की असं काही करणार नाही. त्यामुळे आता त्यांना पुन्हा संधी नाही. असं शरद पवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्ताकारण जरूर करावं पण.., ” सध्याच्या राजकारणावर गडकरींची नेत्यांना चपराक
हेही वाचा…शिंदेंच्या आमदारांचं ६ हजार पानी उत्तरात अनेक दाखले, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष्य
हेही वाचा…शरद पवारांच्या विचारांपासून दुर जाणे म्हणजे गद्दारीच
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्र्यांचा महापालिका प्रशासनाला ‘बुस्टर’, महापालिका आयुक्तांना दिली कौतुकाची थाप
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी क्लिनचीट दिली, पण आता थेट जप्तीचे आदेश”, भाजप आमदाराच्या अडचणी वाढल्या