मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या राष्ट्रवादीच्या पक्षफुटीच्या केंद्रा भोवती फिरतांना दिसत आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पक्षात कोणतीही फुट पडली नाही. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…“काका-पुतण्या महाराष्ट्राला वेड्यात काढताहेत, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे डोकं फुटायची वेळ”
अजित पवार आमचे नेते आहेत. असं सुप्रिया सुळे म्हणू शकते, मी नाही. राष्ट्रवादीत फुट नाही. परंतु त्यांची भूमिका ही पक्षविरोधी आहे. अजित पवार आमचे नेते असं म्हणलोच नव्हतो, असं म्हणत शरद पवार यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे. आज सातारा दौऱ्यावर असतांना दहिवडे याठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. अजित पवारांना पुन्हा संधी नाही. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी संधी देण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की असं काही करणार नाही. त्यामुळे आता त्यांना पुन्हा संधी नाही. असं शरद पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“शड्डू ठोकलाय भावड्या, कोल्हापूरच्या आखाड्यात येतोय तेल लावलेला पैलवान”
शरद पवारांच्या वक्तव्याबाबत अजित पवारांना विचारले असता. त्यावर त्यांनी नो कमेंट् असं उत्तर दिलं आहे. आम्ही सकारात्मक भूमिका घेऊन सरकारमध्ये काम करत आहोत. विरोधकांनी काय आरोप करावेत हा त्यांचा अधिकार आहे. सर्वसामान्य लोकांचे, जनतेचे प्रश्न सोडवण्यावर आमचा भर आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीतून शरद पवारांनी अजित पवारांची केली हाकालपट्टी, भाजपसोबत जाणार नाही
हेही वाचा…“अजित पवारांना आता पुन्हा संधी नाही,” शरद पवारांचा मोठा घुमजाव
हेही वाचा…“शरद पवारांनी गुगली टाकली, भाजपसोबत जाणार नाही”
हेही वाचा…“महाविकास आघाडी महायुतीवर भारी…,” लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“सरकार खोटे बोलले व आता तोंडावर पडले”, भाजप आमदाराच्या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश