कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेते पक्ष संघटन वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता आपल्या जाहीर संभामधून राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांवर निशाणा साधत आहेत. राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर शरद पवारांच्या निशाण्यावर मंत्री छगन भुजबळ होते, त्यानंतर धनंजय मुंडेंची मतदारसंघात शरद पवारांची सभा गाजली, आणि आज कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या मतदारसंघात सभा होत आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे.
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांचं मरण होतंय,” वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
शरद पवार यांची आज कोल्हापुरात सायंकाळी सभा होत असून त्यांचे आता ठिकठिकाणी जोरदार स्वागत कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे. त्याआधी रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे. त्यात असं म्हटलंय की शड्डू ठोकलाय भावड्या. कोल्हापूरच्या आखाड्यात येतोय तेल लावलेला पैलवान. निकाला कुस्ती बघायला यावं लागतंय गड्या. असं म्हणत कार्यकर्त्यांना सभेसाठी येण्याचं आव्हान रोहित पवारांन केलयं.
हेही वाचा…“रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
दरम्यान, शरद पवार यांची आज सांयकाळी चार वाजता दसरा चौकात सभा होत आहे. त्याच्या एक दिवस आधीच रोहित पवार कोल्हापुरात दाखल झाले आहेत. काल पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर हसन मुश्रीफ यांनी देखील त्यावर प्रत्युत्तर दिलं होतं.
शड्डू ठोकलाय भावड्या…
कोल्हापूरच्या आखाड्यात येतोय तेल लावलेला पैलवान..
निकाली कुस्ती बघायला यावं लागतंय गड्या…#स्वाभिमान_सभा
सायंकाळी ४ वाजता#दसरा_चौक#कोल्हापूर pic.twitter.com/NTeW4Ry44l— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“छगन भुजबळांना मंत्रिपदावरून हटवा”, ब्राह्मण महासंघाची मागणी
हेही वाचा…बंडखोरांना जनता धडा शिकवणार? लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा सर्व्हे, कोणाला किती जागा ?
हेही वाचा…“पक्षात कोणतीही फुट नाही” शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा अर्थ काय ?
हेही वाचा…“पक्ष फोडण्याचे आमच्यात संस्कार नाहीत,” चंद्रशेखर बावनकुळेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
हेही वाचा…डिनरमध्ये झुणका भाकर, वडापाव, अन् तुतारी, नाशिक ढोलच्या गजरात इंडियाच्या नेत्यांचं मुंबईत जंगी स्वागत होणार