सातारा : अजित पवार आमचे नेते आहेत, अन् राष्ट्रवादीत कोणतीही फुट पडली नाही. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संपुर्ण राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर अनेक राजकीय नेत्यांनी याचा वेगळा अर्थ काढला. त्यावर आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी यावर स्पष्टिकरण दिलं आहे.
हेही वाचा…“छगन भुजबळांना मंत्रिपदावरून हटवा”, ब्राह्मण महासंघाची मागणी
अजित पवार आमचे नेते आहेत. असं सुप्रिया सुळे म्हणू शकते, मी नाही. राष्ट्रवादीत फुट नाही. परंतु त्यांची भूमिका ही पक्षविरोधी आहे. अजित पवार आमचे नेते असं म्हणलोच नव्हतो, असं म्हणत शरद पवार यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे. आज सातारा दौऱ्यावर असतांना दहिवडे याठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. अजित पवारांना पुन्हा संधी नाही. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी संधी देण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की असं काही करणार नाही. त्यामुळे आता त्यांना पुन्हा संधी नाही. असं शरद पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…बंडखोरांना जनता धडा शिकवणार? लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा सर्व्हे, कोणाला किती जागा ?
दरम्यान, शरद पवार यांची आज कोल्हापुर येथे जाहीर सभा होत आहे. त्यासाठी रवाना झाले असता. शरद पवार यांचं कार्यकर्त्यांकडून जागोजागी स्वागत करण्यात येतंय. तर अजित पवार आज पिंपरी चिंचवड मध्ये असून त्यांचंही जोरदार स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांनी गुगली टाकली, भाजपसोबत जाणार नाही”
हेही वाचा…“महाविकास आघाडी महायुतीवर भारी…,” लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“सरकार खोटे बोलले व आता तोंडावर पडले”, भाजप आमदाराच्या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश
हेही वाचा…“काका-पुतण्या महाराष्ट्राला वेड्यात काढताहेत, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे डोकं फुटायची वेळ”
हेही वाचा…“शड्डू ठोकलाय भावड्या, कोल्हापूरच्या आखाड्यात येतोय तेल लावलेला पैलवान”