मुंबई : राष्ट्रवादीच्या पक्षफुटीबाबत केलेल्या वक्तव्यावरून काल संपुर्ण राजकारण शरद पवार यांच्या भोवती फिरत आहेत. अजित पवार आमचेच नेते आहेत. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्याला फुट म्हणत नाही. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. याच गोष्टीला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दुजोरा दिल्याने राज्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे. त्यावरून आता अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सुचक वक्तव्य करत राष्ट्रवादीवर टिका केलीय.
हेही वाचा…डिनरमध्ये झुणका भाकर, वडापाव, अन् तुतारी, नाशिक ढोलच्या गजरात इंडियाच्या नेत्यांचं मुंबईत जंगी स्वागत होणार
शरद पवार बोलतात, तसं करीत नाही, अन् त्यांनी जे बोललं आहे, ते आतापर्यंत कधी केलं नाही. राष्ट्रवादीची आताच्या खेळी बघितली तर डोकं फुटायची वेळ येईल. हा तर मोठा खेळ असू शकतो, किंवा गेम असू शकतो. एका बाजूला आघाडीत राहून शरद पवार लढतील अन् युतीत राहून अजित पवार निवडणुका लढतील. अन् दोघांचा संघम होऊन पुन्हा एक आपलाच सागर तयार करू शकतात. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांचं मरण होतंय,” वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, काका पुतण्या महाराष्ट्राला वेड्यात काढताहेत. ते सुर्याच्या प्रकाशा इतकं सत्य आहे. त्यात प्रश्न विचारण्याची गरज नाही. असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. परंतु राष्ट्रवादीचा शरद पवार गट अद्यापही विरोधात आहे. मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेटीगाठी होत असल्याने एक गट सत्तेत तर दुसरा गट विरोधात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. यातच सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी पक्षात कोणतीही फुट न झाल्याचं म्हटल्यानंतर आता राज्यात चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शड्डू ठोकलाय भावड्या, कोल्हापूरच्या आखाड्यात येतोय तेल लावलेला पैलवान”
हेही वाचा…“छगन भुजबळांना मंत्रिपदावरून हटवा”, ब्राह्मण महासंघाची मागणी
हेही वाचा…बंडखोरांना जनता धडा शिकवणार? लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा सर्व्हे, कोणाला किती जागा ?
हेही वाचा…“पक्षात कोणतीही फुट नाही” शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा अर्थ काय ?
हेही वाचा…“पक्ष फोडण्याचे आमच्यात संस्कार नाहीत,” चंद्रशेखर बावनकुळेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर