पुणे : कॉंग्रेसने आपल्या ७ उमेदवारांची पहिली यादी महाराष्ट्रात जाहीर केली आहे. येत्या काही दिवसात महाविकास आघाडीतीलही उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यातच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आपले पहिले संभाव्य ०९ उमेदवारांची नावे समोर आली आहेत. तर माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांना शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
हेही वाचा..‘पुण्याच्या सेवेसाठी मोहोळ हक्काचे खासदार असतील’, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विश्वास
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. बारामतीतून विद्ममान खासदार सुप्रिया सुळे, माढ्यातून महादेव जानकर, साताऱ्यातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील पाटील हे उमेदवार असतील. तर शिरूर अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, बीडमध्ये बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे तर वर्ध्यातून अमर काळे शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा आहे.
हेही वाचा…“वेळ पडल्यास भाजपच्या कमळावर निवडणुक लढणार, पण पवारांना पाडणारच ” शिवतारे आक्रमक
दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघावरून सध्या शरद पवार गट आणि मॉर्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांच्या रस्खीखेच सुरू आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून चिंतामन गावित किंवा भगरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातही शरद पवार जुना उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा..धंगेकरांचा राहुल गांधींवर विश्वास नाही का ? रवींद्र धंगेकरांच्या पोस्टवर गिरीश बापटांचा फोटो
हेही वाचा..“रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने पराभूत करू”, नणंदने भावजयाच्या विरोधात रणशिंग फुंकलं
हेही वाचा…“मला लोकसभा निवडणुक लढवायचीच नव्हती, पण…”, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं मोठं विधान
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदार शिंदे गटात दाखल
हेही वाचा…स्वरा भास्कर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ; कॉंग्रेस ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी देणार ?