मुंबई : वेंदात प्रकल्पावरून राज्यात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये फैरी सुरू झाल्या आहेत. यातच राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना करावं, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळात टिका टिप्पणी केली जात आहे. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, जर परवानगी मिळाली नाही तर..;”गुलाबराव पाटील
सुप्रिया सुळे यांनी आधी शरद पवार साहेब आणि अजित दादा काय म्हणतात? हे पाहावं. पहिलं त्यांनी कुटुंबात आणि पक्षात एकमत करावं. तु मला मुख्यमंत्री पद दे, मी तुला देतो एवढा विषय नाही. मुख्यमंत्रीपदासाठी काय रामायण, महाभारत होतं. महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे ही काय देवाण-घेवाण नाही. तु मला वडापाव दे, मी तुला सॅडविच देतो. एवढा सोपा विषय नाही असा टोला प्रवीण दरेकर यांनी हाणला आहे.
“रशियावरून फडणवींसांचा फोन आला अन्…मला सांगितलं की..”; सांमंताचं वेदांत प्रकल्पावर मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे उपरोधित टोला हाणला आहे. त्या म्हणाल्या की, तीन लाख कोटी रूपयांची गुंतवणुक होणार होती. पण केंद्र सरकार आपणाकडून काढून घेते, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. माझी एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, थोड्या दिवसांसाठी शिंदे यांनी आपलं मुख्यमंत्री पद अजित पवार यांना द्यावे. अजित पवार यांना मुख्यमंत्री करावं. एकनाथ शिंदे यांना आम्ही मोठं पद देतो. पण असं चालत नाही असंही सुळे म्हणाल्या.
“देवाचा कौल घेऊन भाजपात प्रवेश केला”; गोव्यातील काॅंग्रेस आमदाराचं वक्तव्य
दरम्यान, वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात सध्या विरोधक आणि सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी रान पेटवलं आहे. अशातच या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली. वेदांत पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
Read also
- “त्या वेळी बहुदा जंयत पाटील अंतराळात फिरायला गेले होते” ; भाजप आमदाराचा टोला
- “तेव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही”; मनसे नेते संदीप देशपांडे
- “उद्योगमंत्र्यांचा तरूणांनी राजीनामा मागितला पाहिजे”; वरूण देसाई
- “पहिल्याच अधिवेशनात दिलेले वचन मुख्यमंत्री पूर्ण करत नसतील तर..;” राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- “वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत”; वेदांतच्या अध्यक्षांचे स्पष्टिकरण