नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच ठिकाणी भाजपचे माजी खासदार हरिचंद्र चव्हाण आणि मॉर्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे माजी आमदार जे. पी. गावित निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. जे.पी. गावित यांच्यासह हरिचंद्र चव्हाण यांनी याआधी शरद पवारांचीही भेट घेतली आहे. परंतु महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“नाहीतर तुमचेच बारा वाजतील”, लंकेंवर टिका करणाऱ्या सुजय विखेंचा घेतला पवारांनी समाचार
जे. पी. गावित यांनी शरद पवारांची भेट घेऊन लोकसभेची जागा मागितली होती. परंतु शरद पवारांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. मात्र तरीही जे. पी. गावित तुतारी चिन्हावर लढण्यास तयार झाले होते. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे माजी खासदार हरिचंद्र चव्हाण हे देखील तुतारी चिन्हावर लढण्यासाठी तयार झाले होते. मात्र पवारांनी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या मर्जीतील भास्कर भगरे यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे दोन्ही नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे आता चव्हाण सह गावित यांनी देखील निवडणुकीत बंडाचा झेंडा हाती घेतल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…अखेर ठरलं..! भाजपच्या खासदाराला ठाकरे गटाकडून उमेदवारी, आज ठाकरे गटात प्रवेश
अशातच भाजपतर्फे मतदारसंघात डॉ. पवार यांना शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही उमेदवारी दिल्याने जनसामान्यांच्या रेट्यामुळे लोकसभा निवडणुक लढविणार असल्याचे चव्हाण यांनी जाहीर केले. त्यासाठी त्यांनी दौरेही सुरू केले आहेत. शेतकरी, आदिवासी, शेतमजूर व सर्व घटकांना गत पाच वर्षात कोणताही न्याय मिळाला नाही. कांद्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर शेतकरी विरोधात भूमिका घेतली. जनतेची घोर निराशा झाल्याने जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे निवडणुकीत उतरणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे.
तर माजी आमदार जे.पी. गावित यांनी भूमिका जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र प्रत्यक्षात गावित यांनी भूमिका घेणे टाळले आहे. माकप राज्य कार्यकारिणीची सोमवारपासून मुंबईत बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत माकप लोकसभा लढविण्याबाबत विचारविनिमय होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“दुर्दैवाने किमंत मिळाली नाही” अन्, ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटलांनी भावनांना वाट करून दिली
हेही वाचा…“समोर पाचशे कोटींचा मालक, अन् त्यांच्यासमोर आपल्याला लढायचं,” राणांच्या विरोधात कडूंनी ठोकला शड्डू
हेही वाचा…पक्ष फुटीत निष्ठावंत राहिल्या, आता लोकसभेची लॉटरी, श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरेंची वाघीण मैदानात
हेही वाचा…“भाजपने तिकीट नाकारलं, ठाकरे गटात प्रवेश, पण ठाकरेंनी घोषीत केला ‘हा’ वेगळाच उमेदवार”
हेही वाचा…“फडणवीसांनी दुसरी चाल रचलीय, शिंदेंचाही माणूस सामील”, जरांगे पाटलांनी दिला कडक इशारा