पुणे : माझ्या आईवडिलांना शिव्या द्या. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना शिव्या देऊ नका. कारण हे मला सहन होणार नाही. असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आह. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्यानंतर भाजपकडून पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावर आता शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी त्यांना जोरदार टोला हाणला आहे.
“सुषमाताई..! आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना निष्ठा शिकवत असतील तर…”; शुंभुराज देसाई
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, आपल्या संस्कृतीनुसार आई बाप हे दैवत आहे आणि त्यांना शिव्या दिल्या तरी चालतील पण मोदी-शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाहीत. चंद्रकांत पाटलांचे हे वक्तव्य म्हणजे लाचारीचा कळस आहे. जन्मदात्या आई बापाशी तरी इमान राखा. हेच का हिंदुत्ववादी संस्कार ? असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला तो लक्षात घेऊन भाजपने पुन्हा सत्ता मिळवली आहे. त्यांनी चांगलं काम केलं असतं तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम केलं असतं. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मला आई वडिलांवरून शिव्या दिल्या तरी चालेल पण नरेंद्र मोदी आणि अमित शहांना बोललेलं मला चालणार नाही. असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
दहा डोक्याचा नाही तर 50 खोक्यांचा खोकासुराचं शिवाजी पार्कवर दहन
तसेच त्यांनी पुण्यातील महापालिकेच्या निवडणुकीबाबत देखील भाष्य केलं. पुण्यात महापालिकेत भाजपचे 100 पेक्षा एक जागा जरी कमी आली तरी मी त्याला यश मानणार नाही. एकनाथ शिंदे यांनी हिमंत दाखवली. त्यांना आपण अंतर पडू देणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत दोघाच्या मिळून 160 जागा निवडून आल्याच पाहिजे. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. बहुमतासाठी कुणाच्या मागे जाण्याची वेळ यायला नको, भाजप असो वा शिवसेना आपलीच जागा म्हणून लढवायची आहे. असं आव्हान देखील त्यांनी केलं आहे.
Read also
- “आघाडीचं सरकार पाडण्यासाठी आम्ही अडीच वर्ष काम केलं”; चंद्रकांत पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
- राहुल शेवाळेंचे उद्धव ठाकरेंवर धक्कादायक आरोप..! “आगी लावणे, पेट्रोल पंप जाळण्याचे त्यावेळी आम्हाला मातोश्रीवरून आदेश”
- “रूपया गिरता जा रहा है, मोदीजी को मजा आ रहा है”; राष्ट्रवादीने डिवचलं
- अखेर ठरलं..! ‘धनुष्यबाण गोठवलं तर ठाकरे ‘या’ चिन्हांवर लढवणार निवडणुक
- शिवसेना नेमकी कुणाची ? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? निवडणुक आयोगाचा निर्णय?