कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज कोल्हापुरात निघत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा निघणार आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. त्यानुसार हा मोर्चा निघत आहे. हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी आहे. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले.
या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, कोल्हापुरात आज जोरदार पाऊसला सुरुवात झाली आहे. कोसळत आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक मराठा आंदोलनस्थळी दाखल, छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी दिग्गज नेते उपस्थित
हे पण वाचा: ‘अजित पवारांनीच गाढवाचा नांगर फिरवण्याचं काम केल आहे’
हे पण वाचा: ‘ओबीसी समाजाला न्याय मिळत नसेल तर ओबीसी कल्याण मंत्रालय बरखास्त करा’
प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात दाखल, मराठा आरक्षण आंदोलनस्थळी छत्रपती शाहू महाराजांना नमन, काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला.
हे पण वाचा: “एकमेकांच्या पायात पाय घालून हे सरकार पडेल” – रावसाहेब दानवे
मराठा मूक मोर्चा
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात 16 जूनपासून कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी पहिलं आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर असल्याने कोल्हापुरात याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शाहू समाधी स्थळाचा परिसर भगवामय झाला आहे.
हे पण वाचा: कामशेतमधील बहुचर्चित उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यास, आमदार सुनील शेळकेंचा नकार