पुणे : पुणे महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाच्या स्टेशनरी खरेदीच्या निविदेतील घोळ वाढतच चालला आहे. निविदा पूर्व बैठक घेणे, निविदा भरलेल्या सर्व ठेकेदारांसमोरच सॅम्पल उघडणे यासह विविध नियमांना फाटा दिल्याची माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा: बाणेर-बालेवाडी भागातील पहिल्या प्रथमोचार आरोग्य केंद्राचे लोकार्पण
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांना स्टेशनरी पुरविण्यासाठी सुमारे ६६ लाख रुपयांची निविदा मध्यवर्ती भांडार विभागाकडून काढण्यात आली आहे. त्यात झालेला गैरप्रकार झाल्याचे एका प्रसार माध्यमांनी समोर आणले आहे. त्यातून अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. नियमानुसार निविदा उघडण्यापूर्वी सर्व ठेकेदारांची निविदा पूर्व (प्री बिड मिटींग) बैठक घेतली जाते. ती खात्याकडून घेण्यात आली नाही. तसेच ज्या ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत, त्या सर्व ठेकेदारांच्या समोर सॅम्पल उघडणे कायद्याने अपेक्षित आहे. परंतु, तसे न करता मर्जीतील एकाच ठेकेदाराच्या समोर त्या उघडण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा: “सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका” चंद्रकांतदादा पाटील
जेणेकरून अन्य ठेकेदारांना अपात्र करणे शक्य व्हावे. याशिवाय, आर्थिक आणि टेक्निकल अशी दोन्ही पाकिटे ओपन केल्यानंतर सर्व ठेकेदारांना कागदपत्रे खुली झाली पाहिजेत. मात्र, ‘एओसी’ ओपन करण्यात आली नाही. त्यामुळे ठेकेदारांना कोणतीही माहिती मिळू नये, असे प्रकार केल्याचे समोर आले आहेत. स्टेशनरी खरेदी करताना निविदेत दिलेल्या अटी आणि प्रत्यक्षात महापालिकेला पुरविण्यात येणाऱ्या वस्तू, यांच्यामध्ये मोठी तफावत असल्याचे खात्यातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळेच अटी-शर्तीमध्ये वस्तूचे चुकीचे स्पेसिफिकेशन टाकून अन्य ठेकेदार कंपन्यांना बाद करायचे आणि मर्जीतील ठेकेदाराला काम मिळण्यासाठी बदल करणे. त्यानुसार पुरवठा झाला नाही, तरी गप्प राहायचे, असे प्रकार सर्रासपणे केले जात असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
Read Also :
- राज ठाकरेंची भेट घेण्याआधी चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
- पेगासस हेरगिरी प्रकरण: होत असलेले आरोप गंभीर, सत्य बाहेर यायला हवं – सर्वोच्च न्यायालय
- सेनेसाठी विदर्भात धोक्याची घंटा, वर्षभरात तिघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- केंद्र सरकार लोकशाहीचे चारही स्तंभ मोडीत काढायला निघाले; संजय राऊतांची घणाघाती टीका
- मुंबईच काय घेऊन बसलात, पूरस्थिती जगभर निर्माण होतेय, तेथे महापालिका आमच्या ताब्यात आहे का?