पुणे : ‘म्हाडा’ची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून यासाठी कोणत्याही दलालाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा विभागीय घटक) पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सांगली येथील विविध योजनेतील एकूण 5 हजार 647 सदनिकांच्या सोडतीचा संगणकीय ऑनलाईन उद्घाटन समारंभ नेहरु मेमोरियल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्काची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. योजनेत घर मिळवून देणाऱ्या दलालाविरुद्ध संबंधित विभागाचे मंत्री, पोलीस विभाग, म्हाडा कार्यालय यांच्याकडे तक्रार करा.
सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी ‘म्हाडा’च्या माध्यमातून काम सुरु आहे. ‘म्हाडा’च्या योजनांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना दर्जेदार आणि माफक किंमतीत घरे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
Read Also :
- पुण्यात या तारखेला सुरू होणार 5वी ते 8वीच्या शाळा, पालिका आयुक्तांचा आदेश
- धन्यवाद भारत!… म्हणून ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी हनुमानाचा फोटो ट्विट करत मानले आभार
- ‘पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना?’, राणेंचा अजित पवारांना सवाल
- ‘हे तर पवारांचे स्वत: विरुद्धच आंदोलन’, भाजपची टीका
- ‘मुख्यमंत्री होण्याची मला कोणतीही घाई नाही’