नवी दिल्ली : भारतात सध्या जगातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने दोन आपतकालीन लसींच्या वापरासाठी मंजूरी दिली होती. याशिवाय भारत लसीचा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक उत्पादक देखील आहे. भारताने लसीला मंजूरी दिल्यानंतर अनेक देशांनी लसीची मागणी केली होती. यात ब्राझीलचा देखील समावेश होता.
आता भारताने ब्राझीलला लस पुरवण्यास सुरुवात केली आहे. याबाबत ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत.
ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांनी तसं पत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं होतं. ब्राझीलकडून करण्यात आलेल्या मदतीच्या मागणीला भारतानं सकारात्मक प्रतिसाद देत लस पुरवण्यास सुरूवात केली..
The honour is ours, President @jairbolsonaro to be a trusted partner of Brazil in fighting the Covid-19 pandemic together. We will continue to strengthen our cooperation on healthcare. https://t.co/0iHTO05PoM
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2021
“जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल आभार,” असं बोलसोनारो म्हणाले.
बोलसोनरो यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोविड महामारीविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणं हा आमचा सन्मान आहे. आरोग्यसेवांवरील आपलं सहकार्य भारत बळकट करत राहिलं.
Read Also :