पुणे : राज्यातील 5वी ते 8वीच्या शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने मागील आठवड्यात परवानगी दिली होती. सोबतच स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्यासोबतच निर्णय घेण्यास सांगितले होते. आता पुणे महापालिकेने हद्दीतील इयत्ता पाचवी ते आठवीचे पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला.
महापालिका प्रशासनाने शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत निर्णय घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.
Maharashtra: Pune Municipal Corporation (PMC) passes an order to allow reopening of schools for classes 5th to 8th from February 1 following SOP (standard operating procedure) that have been provided by the state government.
— ANI (@ANI) January 22, 2021
कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना सरकारने केली आहे. शाळा सुरू करण्याआधी शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. यासोबतच थर्मामीटर, थर्मल गन, ऑक्सिमिटर, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. मात्र अद्याप महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही.
Read Also :
- धन्यवाद भारत!… म्हणून ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी हनुमानाचा फोटो ट्विट करत मानले आभार
- ‘पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना?’, राणेंचा अजित पवारांना सवाल
- ‘हे तर पवारांचे स्वत: विरुद्धच आंदोलन’, भाजपची टीका
- ‘मुख्यमंत्री होण्याची मला कोणतीही घाई नाही’
- काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार शिंदे आघाडीवर?